-
ऋजुता लुकतुके
म्हणता म्हणता भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांची बाजारपेठ विस्तारत चालली आहे. या घडीला भारतीय तसंच परदेशी कंपन्यांच्या मिळून विविध श्रेणींतील ४० इलेक्ट्रिक गाड्या भारतीय रस्त्यांवर फिरत आहेत. महिंद्रा, टाटा, एमजी यांच्या ईव्ही भारतात लोकप्रिय आहेत. गाड्यांचा निव्वळ खप बघितला तर देशात सध्या पहिल्या पाच क्रमांकाच्या ईव्ही आहेत महिंद्रा बीई ६, महिंद्रा एक्सईव्ही, टाटा कर्व्ह, एमजी विंडसर आणि एमजी कॉमेट. वेव्ह मोबिलिटी इव्हा ही देशातील सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. तिची किंमत ३.२५ लाख रुपये इतकी आहे. तर रोल्स रॉईस स्पेक्टर ही ७.५० कोटींची गाडी देशातील सगळ्यात महाग इलेक्ट्रिक गाडी आहे. (Top 5 EVs in India)
(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज चोप्राची आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेला दांडी)
मॉडेल |
किंमत (रुपयांमध्ये) |
महिंद्रा बीई ६ |
१८.९० ते २६.९० लाख |
महिंद्रा एक्सईव्ही ९ई |
२१.९० ते ३०.५० लाख |
एमजी विंडसर ईव्ही |
१४ ते १६ लाख |
टाटा कर्व्ह ईव्ही |
१७.४९ ते २२.२४ लाख |
एमजी कॉमेट ईव्ही |
७ ते ९.८४ लाख |
महिंद्रा बीई ६ ची ताकद २३२ ते २८२ बीएचपी इतकी आहे आणि बूट स्पेस ४५५ लीटर इतकी प्रशस्त आहे. शिवाय १४० केडब्ल्यूच्या चार्जरने २० मिनिटांत गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकते. एकदा चार्ज झाल्यानंतर गाडी ५५७ ते ६८३ किमींपर्यंत धावू शकते. आपल्या कामगिरीच्या जोरावर ही कार भारतातील सर्वाधिक खपाची ईव्ही ठरली आहे. तर महिंद्रा एक्सईव्ही ९ई ही भारतातील आणखी एक लोकप्रिय ईव्ही आहे. या गाडीचं इंजिन महिंद्रा बीई ६ सारखंच आहे. पण, बूट स्पेस आणखी प्रशस्त म्हणजे ६६३ लीटरची आहे. या गाडीची बॅटरीही २० मिनिटांत संपूर्ण चार्ज होऊ शकते आणि त्यानंतर ५४२ ते ६५६ किमींचा पल्ला ही गाडी गाठू शकते. महिंद्राची ही प्रिमिअर श्रेणीतील ईव्ही म्हणावी लागेल. (Top 5 EVs in India)
एमजी विंडसर ही आकाराने एसयुव्ही म्हणून मोठी पण, बॅटरी आणि कामगिरीच्या मानाने अतिशय किफायतशीर म्हणून लोकप्रिय ठरली आहे. ६०४ लीटरची बूट स्पेस यात तुम्हाला मिळते. गाडीची शक्ती १३४ हॉर्स पॉवरची आहे आणि ५० केडब्ल्यू क्षमतेच्या बॅटरीला ही गाडी पूर्ण चार्ज करण्यासाठी ५५ मिनिटं लागतात. एकदा चार्ज झाल्यावर गाडी ३३२ किमी चालते. (Top 5 EVs in India)
(हेही वाचा – Fire : अंधेरीमध्ये निवासी इमारतीला आग; एकाचा मृत्यू, सहा जण रुग्णालयात दाखल)
टाटा मोटर्सने तर सुरुवातीपासून आपलं लक्ष ईव्ही गाड्यांवर केंद्रीत केलं आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या पुढील गाड्या आधी ईव्हीमध्ये बनतील आणि मग बाकीची मॉडेल येतील अशीच भूमिका घेतली आहे. अलीकडे कंपनीची नवीन आलेली टाटा कर्व्ह ही गाडी लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. या सेदान गाडीची शक्ती १४८ ते १६५ बीएचपी इतकी आहे आणि ७० केडब्ल्यू क्षमतेच्या चार्जरने ४० मिनिटांत गाडी संपूर्ण चार्ज होऊ शकते. एकदा चार्ज झालेली गाडी ४३० ते ५०२ किमींपर्यंत चालते. एमजी कॉमेट ईव्ही ही देशातील ४ सीटर सगळ्यात लहान गाडी आहे. गाडीचा आकार लहान त्यामुळे शक्तीही ४१.४२ बीएचपी इतकी आहे आणि एकदा चार्ज केल्यावर गाडी २३० किमी चालू शकते. (Top 5 EVs in India)
ईव्ही हा पर्यावरणपूरक पर्याय असल्यामुळे तसंच शून्य कार्बन उत्सर्जनाकडे देश वाटचाल करत असताना इलेक्ट्रिक गाड्यांचं महत्त्व देशांत वाढत आहे. शिवाय ईव्हीची रस्त्यावरील कामगिरी पेट्रोल, डिझेल इंजिनाच्या तुलनेत जास्त चांगली आहे. पेट्रोल, डिझेलसाठी रांग लागत असताना ईव्ही चार्ज करणं सोसायटीतही शक्य आहे. ती सुविधाही लोकांना आवडते आहे. त्यामुळे भारतात ईव्हीचा प्रसार होताना दिसतोय. (Top 5 EVs in India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community