Online Fraud रोखण्यासाठी केंद्राचं मोठं पाऊल, मोबाईलमध्ये जपून ठेवा ‘हा’ 4 अंकी नंबर

136

देशभरात सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्हे करण्यासाठी सायबर भामटे अनेक शक्कल लढवतात आणि वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत तुमचे खाते साफ करतात. मात्र ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत ग्राहकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे.

(हेही वाचा – एलॉन मस्क ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा देणार! ट्विट केले आणि…)

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्राने चार आकडी क्रमांकाचा हेल्पलाईन नंबर दिला आहे. हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, असे आवाहन केंद्राने केले आहे. जेणेकरून गरजेच्या वेळी हा नंबर तुम्हाला फायदेशीर ठरेल. या क्रमांकावरुन तुम्हाला सायबर फसवणुकीची तक्रार करता येईल. त्यामुळे हा क्रमांक सेव्ह करणे आवश्यक आहे.

beware

मोबाईलमध्ये जपून ठेवा ‘हा’ 4 अंकी नंबर

दरम्यान, कॅनरा बँकेने ग्राहकांना या बाबत ट्विट करून माहिती दिली आहे. बँकेने ट्विट करून असे सांगितले की, आता कोणत्याही सायबर फसवणुकीविरोधात तुम्हाला थेट तक्रार करता येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय सायबर क्राईमच्या हेल्पलाईन क्रमांकाची मदत घेता येईल. राष्ट्रीय सायबर क्राईमच्या गुन्हे विभागाने हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, तुम्ही 1930 या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवू शकतात. हा क्रमांक तुम्हाला मोबाईलमध्ये सेव्ह करता येईल. यासह . https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावरही तुम्हाला तक्रार नोंदविता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.