भारतीय लवकर झोपुन लवकर उठतात! जीआयएसएसचा अहवाल २०२१ 

कोरोना जागतिक महामारी, लॉकडाऊनचा काळ हा अनेकांसाठी चांगल्या सवयी लावून गेला, हे मान्य करायला हवे. विशेषतः नाईट लाईफची सवय जडलेल्या शहरी लोकांना त्यांची सुयोग्य दिनचर्या बनवण्यासाठी हा काळ फायदेशीर ठरला. 

117

असे म्हणतात ज्याला दररोज कामाला जावे लागते, त्याला जर घरात बसून ठेवले, तर तो आळशी बनतो, सारखा झोपतो, स्थूल बनतो, त्याची दिनचर्या बिघडते, पण थोडे थांबा! भारतीय याला अपवाद ठरले आहेत. मागील वर्षभराचा काळ याला पुरावा आहे. मार्च २०२० पासून देशभरात लॉकडाऊन लागू झाला. २०२० या वर्षभरात सर्वच ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरु होते. मात्र याच ‘वर्क फ्रॉम होम’ने भारतीयांची दिनचर्या चक्क सकारात्मकतेत बदलली आहे. ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०२१ (जीआयएसएस) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार बहुतांश भारतीय रात्री १० वाजता झोपू लागले असून सकाळी ७ वाजताच्या आत उठत आहेत. ‘१९ मार्च’ हा जागतिक झोप दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या दिवसाचे औचित्य साधून ही संस्था दरवर्षी झोपेच्या संबंधी अहवाल प्रसिद्ध करत असते.

जीआयएसएसने मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान हा सर्वे केला आहे. त्यामध्ये भारतातील विविध शहरांमधील १८ ते ४५ वयोगटातील १६ हजार जणांची मते जाणून घेतली आहेत. जीआयएसएस या संस्थेने २०१८ साली पहिला अहवाल प्रसिद्ध केला होता. तेव्हापासून हा चौथा अहवाल आहे. यासाठी आतापर्यंत १ लाख जणांना या सर्व्हेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

गाढ झोपणाऱ्यांची संख्या वाढली! 

या अहवालानुसार २०२० मध्ये मध्यरात्री झोपणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे, ती २८ टक्क्यांवरून २६ टक्के झाली आहे. विशेष म्हणजे २०२० मध्ये १९ टक्के लोक मध्यरात्री झोपत होते, तेच प्रमाण आता २०२१ मध्ये २४ टक्के झाले आहे. कारण पुन्हा सर्व व्यवहार सुरु झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता निद्रानाशाची भीती वाटू लागली आहे. ४२ टक्के लोक महामारीच्या काळात घरी असताना गाढ झोप येत होती, असे म्हणाले. हेच प्रमाण २०१९च्या अहवालात फक्त २२ टक्के होते.

(हेही वाचा : देशात टोलनाके होणार बंद! पण…)

सकाळी उठण्याची सवय वाढली! 

‘वर्क फ्रॉम होम’मुळे लवकर झोपण्याची संधी मिळाल्याने शांत झोप होते आणि सकाळी लवकर जाग येते, असेही अनेकांनी म्हटले आहे. ३८ टक्के पुरुष आणि ३० टक्के महिला ह्या सकाळी ७ वाजताच्या आत उठतात, सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय लागल्याचेही ते सांगतात. तर ७७ टक्के लोक म्हणाले की, ते कामाच्या वेळेत दुपारी १ ते ३ मध्येही झोप काढतात.

झोपेपर्यंत सोशल मीडियासोबत राहणारे अधिक! 

सोशल मीडियाचे व्यसन ही सध्याची मोठी समस्या आहे. अगदी बिछान्यापर्यंत सोशल मीडियाची सोबत असते. तब्बल ९२ टक्के लोक म्हणाले कि, रात्री झोपायला बिछान्यावर आल्यावरही सोशल मीडियात सक्रिय होतो, बंगळुरूमध्ये तीन पैकी दोन जण या व्यसनाच्या असा प्रकारे याच्या आहारी गेल्याचे लक्षात आले आहे. चेन्नईतही अशीच स्थिती आहे. गुरुग्राम येथे २५ टक्के लोक झोपेपर्यंत कार्यालयीन काम करतात, असे म्हणाले. मुंबईत सर्वाधिक ४३ टक्के लोक हे रात्रीपर्यंत सोशल मीडियात खिळलेले असतात, असे दिसून आले असून त्या खालोखाल कोलकता ३८ टक्के लोक आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.