Monsoon Food : पावसाळ्यातील औषधी, गुणकारी रानभाज्या; आवर्जून खा…आजारांना पळवा

224

पावसाळा सुरू झाला की, बाजारात रानभाज्यांची आवक वाढते. कोणतेही खत किंवा किटकनाशक न वापरता या भाज्या पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवतात. या रानभाज्या मुरबाड, वसई, कर्जत, पालघर, सफाळे या ठिकाणी आढळतात. या भागातील महिला या रानभाज्या मुंबईत येऊन विकतात. या भाज्या जशा चवीला रुचकर असतात तसेच त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा आहेत. या रानभाज्यांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया…

( हेही वाचा : Monsoon Food : पावसाळ्यात गरमागरम वडापाव खाण्यासाठी ‘या’ आहेत मुंबईतील TOP 10 जागा! )

रानभाजीचे नाव : आंबाडी

औषधी गुणधर्म : मिरपूड व साखर यांच्यासोबत आंबाडीचा रस सेवन केल्यास हा रस पित्तनाशक ठरतो.

New Project 3 12

रानभाजीचे नाव :  शेवगा

औषधी गुणधर्म : यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम, संत्र्यांच्या सहापट जीवनसत्व व केळीच्या तीनपट पोटॅशियम तसेच लोह व प्रथिने असतात. यामध्ये जंतूनाशक गुणधर्म असून मधुमेह व उच्च रक्तदाब यावर ही रानभाजी उपयुक्त, शारीरीक व मानसिक थकवा या भाजीने कमी होतो.

New Project 4 10

रानभाजीचे नाव : उंबर

औषधी गुणधर्म : याची पाने विंचू चावल्यावर वाटून लावल्यास वेदना कमी होतात. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधूमेह इ. रोगावर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.

New Project 5 12

रानभाजीचे नाव :- पिंपळ

औषधी गुणधर्म : या रानभाजीची साल, सालीची राख, कोवळी व सुकी पाने, फळे व बिया औषधांसाठी वापरले जाते.

New Project 6 11

रानभाजीचे नाव : तांदुळजा

औषधी गुणधर्म : या भाजीमध्ये व्हिटॅमीन सी चे प्रमाण जास्त असते. गोवर, कांजण्या व तीव्र ताप यामध्ये उपयुक्त तसेच विष विकारी, नेत्र विकारी, पित्त विकारी, मुळव्याध, यकृत या विकारात गुणकारी.

New Project 7 8

रानभाजीचे नाव : माठ

औषधी गुणधर्म : रक्तवर्धक, वजनवाढीसाठी तसेच आम्लपित्त या विकारावर गुणकारी, शौचास साफ होते. मुतखडा असणा-या व्यक्तीनी या भाजीचे सेवन करणे टाळावे.

New Project 8 7

रानभाजीचे नाव : आघाडा

औषधी गुणधर्म : या रानभाजीची फळे, फुले, पाने, मुळे औषधासाठी वापरतात. यात व्हिटॅमिन्स, प्रथिने, अॅन्टीऑक्सीडन्टस् व खनिजे मुबलक प्रमाणात असतात.

New Project 9 8

रानभाजीचे नाव : कडवंची

औषधी गुणधर्म : कडवंचीचे फळ पोटाच्या विकारावर, यकृत व प्लीहा या अवयवांच्या बिघाडावर व मधुमेहावर गुणकारी आहे.

New Project 11 6

रानभाजीचे नाव : चुका

औषधी गुणधर्म : उष्णतेचे विकार, पचनक्रिया सुधारते, सुज कमी होते, रक्तदाब नियंत्रण होते.

New Project 12 5

रानभाजीचे नाव : हादगा

औषधी गुणधर्म : खोकला, हिवताप व पित्त कमी होते. या भाजीच्या फुलाचा रस मधातून घेतल्यास छातीतील कफ कमी होण्यास मदत होते.

New Project 13 5

रानभाजीचे नाव : पाथरी

औषधी गुणधर्म : पित्तनाशक, सर्वच प्रकारच्या विषबांधावर गुणकारी, पानाचा रस खोकला विकारावर उपयोगी तसेच त्वचेचे आजार व रक्त शुद्धीसाठी, मुत्रपिंड व मुत्रविकारावर गुणकारी, काविळ व यकृत विकारावर उपयुक्त.

New Project 14 7

रानभाजीचे नाव : चिघळ

औषधी गुणधर्म : या भाजीमध्ये व्हिटॅमीन्स, फायबर, प्रोटान्स मोठया प्रमाणत असतात. तसेच लोह व तांबे यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे हिमोग्लोबीन वाढीसाठी उपयुक्त. लघवी साफ होते, मुळव्याध विकारावर गुणकारी.

New Project 15 6

रानभाजीचे नाव : अळू

औषधी गुणधर्म : अळूचे देठ मीठाबरोबर वाटून सुजलेल्या गाठी ओसरण्यास लेप म्हणून वापरतात. या पानाचा रस जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते.

New Project 10 6

रानभाजीचे नाव : टाकळा

औषधी गुणधर्म : टाकळ्याचा काढा दात येताना मुलांना येणा-या तापावर गुणकारी, पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला, त्वाच्यारोग, वात व कफदोष यावर पानाचा रस मधातून देतात.

New Project 16 6

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.