कोरोनावर मात करण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले ‘हे’ उपाय! कोणते जाणून घ्या…

81

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे भारतावर तिसऱ्या लाटेचे संकट ओढवले आहे. दिल्ली, मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांना बूस्टर डोस, मास्क लावणे तसेच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता आयुष मंत्रालयाने कोरोना महामारी रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

सामान्य उपाय

कोरोनावर मात करण्यासाठी सामान्य उपाय म्हणून दिवसभरात अनेक वेळा कोमट पाणी प्या, दिवसातून किमान ३० मिनिटे योग, प्राणायाम आणि ध्यान करा. हळद, जिरे, धणे अशा मसाल्यांचा जेवणात समावेश करावा. स्वयंपाक करताना लसूण वापरावा, असा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे बंद! मात्र प्रवाशांची रेल्वेकडून लूट )

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय:

  • सकाळी १० ग्रॅम च्यवनप्राश अवश्य सेवन करा. मधुमेहींनी साखरमुक्त च्यवनप्राशचे सेवन करावे.
  • तुळस आणि दालचिनीपासून बनवलेला हर्बल चहा प्या.
  • दालचिनी, काळी मिरी, शुंथी (कोरडे आले) आणि मनुका (बेदाणे) – दिवसातून एकदा किंवा दोनदा खाणे आवश्यक आहे.
  • गूळ आणि लिंबाचा रस याचे सेवन करणे आवश्यक आहे.
  • गोल्डन मिल्क – १५० मिली कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळा आणि दिवसातून एक किंवा दोनदा प्या.

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनापासून तुमचे संरक्षण होण्यास मदत होईल, असे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.