Health : रात्री ‘या’ तीन पावडरचे सेवन केल्यास आरोग्यास मिळतील जबरदस्त फायदे

86

आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या कित्येक गोष्टींपासून आरोग्यास भरपूर फायदे मिळतात. अनेकांना याबाबत माहिती असूनही ही मंडळी जंक फूड, फास्ट फूड अशा आरोग्यास (Health) घातक असणाऱ्या पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन करतात. पण मित्रांनो वेळीच सावध व्हा अन्यथा आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्यांपासून सुटका हवी असल्यास तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या अळशी, सूंठ आणि दालचीनीचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करून पाहा. या तीन गोष्टींचे योग्य प्रमाणात व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सेवन केल्यास आरोग्यास मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकतात. कारण या तिन्ही गोष्टींमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे.

बद्धकोष्ठतेची समस्या होते दूर 

आपण देखील बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून त्रस्त आहात तर रात्री झोपण्यापूर्वी अळशी, सूंठ आणि दालचीनीच्या पावडरचे एकत्रित सेवन करा. योग्य प्रमाणात या मिश्रणाचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.

(हेही वाचा Women’s Reservation Bill : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर)

सांधेदुखीची समस्या होते कमी

हाडांचे दुखणे, सांधेदुखीच्या समस्येतून सुटका हवी असल्यास आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या तिन्ही पावडरचे मिश्रण तयार करून त्याचे सेवन करा. कारण यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे साध्यांचे दुखणे आणि सूज इत्यादी समस्या दूर होण्यास मदत मिळते.

सर्दी-खोकल्याची समस्या होते दूर 

सर्दी-खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी अळशी, सूंठ आणि दालचीनीच्या पावडरचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे. कारण यामध्ये सर्दी-खोकल्याची समस्या कमी करण्यास उपयुक्त असणारे औषधी गुणधर्म आहेत.

वेटलॉससाठी लाभदायक 

आपण देखील वजन कमी करण्यासाठी फार मेहनत घेत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी अळशी, सूंठ आणि दालचीनीच्या पावडरचे सेवन करावे. कारण यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीराचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत मिळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.