Mobile Phone : फोन हरवला तरी घाबरू नका; ‘या’ सोयीमुळे पटकन फोन परत मिळणार

टेक्नोलॉजी डेव्हलपमेंट बॉडी फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलीमॅटिक्स या विभागाने एक यंत्रणा निर्माण केली आहे.

149

घाई गर्दीत फोन मारणाऱ्यांची कोणत्याही शहरात कमतरता नाही. मात्र फोन चोरीला गेल्यावर तो परत मिळवण्यासाठी युजर्स प्रयत्न करताना दिसत नाहीत. कारण पुन्हा फोन मिळणारच नाही, यावर त्यांचा विश्वास असतो. आता हे चित्र बदलणार आहे. केंद्र सरकार एका विशेष यंत्रणेच्या निर्मितीवर काम करत आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे हरवलेला फोन परत मिळवणे किंवा तो कायमसाठी ब्लॉक करणे शक्य होणार आहे.

टेक्नोलॉजी डेव्हलपमेंट बॉडी फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलीमॅटिक्स या विभागाने एक यंत्रणा निर्माण केली आहे. त्या यंत्रणेचे नाव सीइआयाआर (CEIR)असे आहे.

या प्रदेशात यशस्वी तपासणी

  • महाराष्ट्र
  • दिल्ली
  • कर्नाटक
  • ईशान्य भारत

या भागातील काही वापरकर्त्यांनी या यंत्रणेची यशस्वी तपासणी केली आहे. केंद्रातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल आणखी माहिती दिली. ते म्हणाले की, १७ मे पासून ही सुविधा संपूर्ण देशभरातील नागरिकांना वापरता येईल.

(हेही वाचा The Kerala Story : ‘लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होईल या भीतीने ‘द केरळ स्टोरी’ला विरोध)

नक्की यंत्रणा कशी आहे

प्रत्येक मोबाईलचा एक विशिष्ट आयएमइआय नंबर असतो. हा नंबर युनिक असतो. दूरसंचार ऑपरेटरकडे आणि सीइआयआर सिस्टीममध्ये हा आयएमइआय नंबर स्टोअर असतो. इतकचे नाही तर कोणत्या आयएमइआय नंबर सोबत कोणता मोबाईल नंबर जोडलेला आहे, याची माहिती सु्द्धा दूरसंचार ऑपरेटरकडे आणि सीइआयआर सिस्टीममध्ये असते. या पुढे हरवलेला फोन शोधण्यासाठी ही माहिती वापरली जाणार आहे.

कनार्टक पोलिसांनी या यंत्रणेचा यशस्वी वापर केला आहे. चोरीला गेलेले २५०० हून अधिक फोन्स त्यांनी सीइआयआर प्रणालीच्या सहाय्याने शोधले आणि ज्याचे होते त्याला परत दिले. सीइआयआरमुळे फोन चोरणे अशक्य होणार नाही. पण या प्रणालीमुळे एक गोष्ट होईल. ती म्हणजे या पुढे चोरीचा फोन वापरणे व्यर्थ ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.