Turmeric Milk : हळदीचे दूध पिणे, हे आजार असणाऱ्यांसाठी ठरू शकते घातक

133

हळद हा एक लोकप्रिय मसाला आहे, जो अन्न आणि पेयांमध्ये वापरला जातो. हळद हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आयुर्वेदात हळदीचा वापर आरोग्याशी संबंधित अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हळदीमध्ये कर्क्यूमिन आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. अँटीबायोटिक आणि अँटिसेप्टिक्स व्यतिरिक्त, त्यात हीलिंग प्रॉपर्टीज असते. दुधात हळद मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

हळदीचे दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पण हिवाळ्यात त्याचे सेवन अधिक फायदेशीर ठरते. उन्हाळा आणि पावसाळ्यात त्याचा वापर कमीत कमी करावा. याशिवाय काही समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी हळदीचे दूध पिऊ नये. असे करणे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला हळदीचे दूध पिणे कोणासाठी हानिकारक ठरू शकते हे सांगणार आहोत.

(हेही वाचा BMC : आता भांडुपकरांचा चार किलोमीटरच्या प्रवासाचा वळसा वाचणार; महापालिका बांधतेय भांडुप पूर्व- पश्चिमेला जोडणारे पूल)

आहारतज्ञांच्या मते, लोकांनी सावधगिरीने हळदीचे दूध सेवन केले पाहिजे. हळदीचे दूध प्रत्येकासाठी चांगले नसते आणि ते काही लोकांचे आरोग्य बिघडू शकते. लोकांनी विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात हळदीचे दूध पिणे टाळावे. गर्भवती महिला आणि ब्रेस्टफीडिंग करणाऱ्या महिलांनी हळदीचे दूध पिऊ नये. असे करणे धोकादायक ठरू शकते. ज्या महिलांना अॅनिमियाचा त्रास आहे त्यांनीही हळदीचे दूध पिऊ नये. हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरातील लोहाचे शोषण थांबते आणि लोहाची कमतरता निर्माण होते. यामुळे अॅनिमियाची समस्या उद्भवू शकते.

या लोकांसाठी हळदीचे दूध धोकादायक आहे

  • आहारतज्ञांच्या मते, कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हळदीचे दूध पिऊ नये, कारण त्यामुळे रक्तदाब कमी होतो.
  • नेकांना दुधाची अॅलर्जी असते, त्यांनी हळदीचे दूध पिऊ नये. अन्यथा त्याची प्रकृती झपाट्याने बिघडू शकते.
  • हळदीच्या दुधामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.
  • हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन नावाचे रसायन मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. त्यामुळे हळदीचे दूध टाळावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.