Childhood Diabetes : गोडवा पाकीटबंद अन्नाचा, फास वेढणाऱ्या व्याधींचा!

Childhood Diabetes : गोडवा पाकीटबंद अन्नाचा, फास वेढणाऱ्या व्याधींचा!

78
Childhood Diabetes : गोडवा पाकीटबंद अन्नाचा, फास वेढणाऱ्या व्याधींचा!
Childhood Diabetes : गोडवा पाकीटबंद अन्नाचा, फास वेढणाऱ्या व्याधींचा!
  • धनराज साळवी

भारतासह देशभरात आजकाल घरोघरी लहान मुलांच्या हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात चिप्सचे पाकीट किंवा बर्गर्स सहज दिसतात. पण, हेच ‘जंक फूड’ आणि बदलती जीवनशैली लहान मुलांचे आरोग्य उध्वस्त करत आहे. एकेकाळी वृद्धापकाळात किंवा चाळीशीनंतर आढळणारा मधुमेह(Childhood Diabetes)आजार आता लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगाने पसरताना दिसत आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, भारतातील १५ ते ४९ वयोगटातील नागरिकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. या लठ्ठपणासोबतच लहान वयातच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि भविष्यात हृदयरोगाचा धोका निर्माण होत आहे.(Childhood Diabetes)

या मधुमेहामुळे आजारांमागे केवळ अनुवंशिकता कारणीभूत नसून आपली जीवनशैली हे मुख्य कारण आहे. तसेच ‘जंक फूड’ आणि प्रक्रिया केलेले अन्न यामुळे बाजारात मिळणारे पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स आणि पाकीटबंद पदार्थांमध्ये सोडियम, साखर आणि ‘ट्रान्स फॅट’चे प्रमाण प्रचंड असते. हे पदार्थ शरीराला ऊर्जा देत नाहीत, तर फक्त चरबी वाढवतात. तरुण आणि कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या सवयीमुळे कामाचा ताण, उशिरापर्यंत जागणं आणि ‘रेडी-टू-ईट’ किंवा ‘फास्ट फूड’वर अवलंबून राहणं यामुळे तरुण पिढी आणि नोकरदार वर्ग लठ्ठपणाला बळी पडत आहे. याच सवयींचा अनुकरण लहान मुलेही करत आहेत. शारीरिक श्रमाचा अभाव असल्यामुळे मैदानी खेळ पूर्णपणे बंद होऊन मुलांचे आयुष्य आता स्क्रीनपुरते मर्यादित झाले आहे.(Childhood Diabetes)

आकर्षक जाहिरातींचा भुलभुलैया

लहान मुलांना या जंक फूडच्या जाळ्यात ओढण्यात टीव्ही आणि सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींचा मोठा वाटा आहे. कार्टून कॅरेक्टर्सचा वापर करून बनवलेल्या चिप्स, चॉकलेट्स आणि ज्यूसच्या जाहिराती थेट मुलांच्या मनावर ताबा मिळवतात. तसेच, या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर असणारे ‘लेबलिंग’ अत्यंत आकर्षित करणारे असते. त्यात किती साखर, ट्रान्स फॅट किंवा सोडियम आहे, हे सामान्य पालकांना सहज समजेल अशा भाषेत लिहिलेले नसते.(Childhood Diabetes)

मधुमेहाची लक्षणे आणि धोका ?

यामध्ये मुलांना वारंवार लघवी होणे, सतत तहान लागणे, जास्त भूक लागणे, अचानक वजन कमी होणे, थकवा, दृष्टी धूसर होणे आणि वारंवार संसर्ग होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. तर वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास डायबेटिक केटोॲसिडोसिस (डीकेए), तीव्र निर्जलीकरण तसेच डोळे, मूत्रपिंड, मज्जातंतू आणि हृदयावर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ञ सांगतात.(Childhood Diabetes)

काळजी काय घ्यावी?

शाळेतील वातावरण संवेदनशील आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. मुलांच्या आरोग्याची माहिती शिक्षक आणि शाळेतील वैद्यकीय पथकाला देणे, रक्तातील साखर कमी झाल्याची लक्षणे ओळखण्याचे प्रशिक्षण देणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी ठेवणे गरजेचे आहे. तसेच मुलांकडे इन्सुलिन, ग्लुकोमीटर, ग्लुकोजच्या गोळ्या किंवा ग्लुकोन-डी, पौष्टिक खाऊ, पाण्याची बाटली आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक असलेले किट कायम असावे. इन्सुलिन घेतल्यानंतर जेवण चुकवू नये, याची विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांना खेळ, क्रीडा स्पर्धा, सहली किंवा इतर शालेय उपक्रमांपासून दूर ठेवण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उलट, त्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व उपक्रमांत सहभागी करून घेणे, इन्सुलिन घेण्यासाठी शाळेत सुरक्षित व गोपनीय जागा उपलब्ध करून देणे, त्यांच्यावरील चेष्टा किंवा भेदभाव रोखण्यासाठी शाळेने संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.(Childhood Diabetes)

आजच पावले उचलणे का गरजेचे आहे?

जर आपण आताच सतर्क झालो नाही, तर येणारा काळ लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरेल. यासाठी पुढील गोष्टी त्वरित अमलात आणायला हव्यात. घरचा आहार हाच उत्तम आहार असून मुलांना पाकीटबंद अन्नाऐवजी फळे, सुकामेवा, मोड आलेली कडधान्ये आणि घरात बनवलेले ताजे अन्न खाण्याची सवय लावा. शाळेच्या कॅन्टीनमधून ‘जंक फूड’वर पूर्ण बंदी आणून आरोग्यदायी पर्यायांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच ‘स्क्रीन टाइम’ कमी करून मुलांना रोज किमान १ तास मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करणे खूप महत्त्वाचे आहे. शासनाने अन्नपदार्थांवरील ‘फ्रंट-ऑफ-पॅक’ लेबलिंग (उदा. लाल रंगाचा धोक्याचा इशारा) सक्तीचे केले पाहिजे, जेणेकरून पालकांना कोणते पदार्थ घातक आहेत हे लगेच समजेल. पालकांना आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर त्यांचे आजचे आरोग्य सांभाळणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. चला, आजच आपल्या कुटुंबाची जीवनशैली बदलूया आणि मधुमेहमुक्त भारत घडवूया.(Childhood Diabetes)

भारतात ३ लाखांहून अधिक किशोरवयीन मुलं टाइप १ मधुमेह आजाराने ग्रासली आहेत, तर वाढता लठ्ठपणा आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे किशोरवयीन मुलांमध्ये टाइप २ मधुमेहाचे प्रमाणही वाढत आहे. टाइप १ मधुमेह हा स्वयंप्रतिकार विकार असून तो साखर किंवा जंक फूडमुळे होत नाही. मात्र, टाइप २ मधुमेहासाठी लठ्ठपणा हे महत्त्वाचे कारण आहे. वारंवार तहान लागणे, लघवी होणे, वजन घटणे किंवा थकवा जाणवणे ही लक्षणे दिसल्यास रक्तातील साखर आणि HbA1c तपासणी करून त्वरित निदान व उपचार सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे डायबेटिक केटोॲसिडोसिस सारख्या जीवघेण्या गुंतागुंती टाळता येतात.(Childhood Diabetes)

~ डॉ साहिल लंगडे, एम डी (मेडिसीन) आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.