नव्या वर्षात घर खरेदी करताय? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा…

123

हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचा आवर्जून विचार करावा लागतो. घर केवळ राहण्यासाठीच नाही तर गुंतवणुकीसाठीही उत्तम पर्याय आहे. जेव्हा तुम्ही नवी मालमत्ता खरेदी करता तेव्हा ती मालमत्ता नोंदणीकृत असणे महत्त्वाचे असते.

( हेही वाचा : ठाणेकरांनो ! नव्या वर्षात ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर )

नवे घर करताना या गोष्टींची काळजी घ्या…

सर्व कागदपत्रे तपासा

घर खरेदी करण्यापूर्वी, मालमत्ता नोंदणीकृत आहे का याची खात्री करा. सर्व कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे. डेव्हलपर, मार्केट रेप्युटेशन, डेव्हलपरचे भूतकाळातील रेकॉर्ड आणि रेरे (RERA)रजिस्ट्रेशन क्रमांक यांसारखे मुद्दे तपासून घ्या.

वाद किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणांची खात्री करा

अनेकदा घरांवर खटले दाखल होतात किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे मालमत्तेवरून वाद होतात अशी मालमत्ता खरेदी करणे टाळा.

पुनर्विक्रीची किंमत तपासा

बऱ्याचवेळा आपण मालमत्ता खरेदी करतो परंतु पुढे जाऊन ती मालमत्ता विकल्यास चांगला परतावा मिळत नाही. त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी त्यावर उपलब्ध भाडे आणि पुनर्विक्री संदर्भात माहिती जाणून घ्या. पुनर्विक्री केल्यावर किती परतावा येईल याबाबत माहिती घ्या.

मालमत्तेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे आवश्यक

मालमत्तेच्या विमामुळे आग, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून मालमत्तेचे संरक्षण होते. मालमत्तेचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे आवश्यक आहे तसेच मालमत्तेची व्याप्ती आणि मोजमाप यांची तपासणी केली पाहिजे.

मालमत्तेचे स्थान

मालमत्तेचे स्थान सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही खरेदी करणाऱ्या घरापासून जवळ पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का? याचा अंदाज घ्या. चांगल्या पायाभूत सुविधा जवळपास असतील तर गुंतवणुकीवर चांगला परतावा आणि चांगले भाडेही मिळेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.