Bun Maska : मुंबईमध्ये ‘या’ ५ ठिकाणी ’बन मस्का’चा आस्वाद नक्की घ्या!

59
Bun Maska : मुंबईमध्ये 'या' ५ ठिकाणी ’बन मस्का’चा आस्वाद नक्की घ्या!

पोर्तुगीजांमुळे भारतात ब्रेड आला असं इतिहासात सांगितलं जातं. मुंबई, गोवा यांसारख्या अनेक ठिकाणी ते स्थायिक झाले. त्यांच्यासोबत त्यांनी त्यांची खाद्यसंस्कृती भारतात आणली. त्यात ब्रेडचाही समावेश होता. (Bun Maska)

कालांतराने समाजात एकमेकांच्या खाद्यसंस्कृतींची देवाण-घेवाण होत गेली. बन म्हणजे ब्रेडला लोणी म्हणजे मस्का लावून चहासोबत खाणं सुरू झालं. नव्हे तर बन मस्का (Bun Maska) ही जोडगोळी लोकप्रिय झाली. इराणी समाजाने इथे व्यवसाय करण्यासाठी कॅफे आणि रेस्टॉरंट सुरू केले. तिथे त्यांचा स्पेशल इराणी चहा मिळतो. या इराणी चहासोबत बन मस्का म्हणजे, अगदी स्वस्त आणि साधा असला तरी मनाला आनंद आणि पोटाला आराम देणारा नाश्ता होय. (Bun Maska)

बन मस्कासोबत इराणी चहा हे एक स्वर्गीय कॉम्बिनेशन आहे. आता पावसाळा सुरू झालाय. जसं पावसाळ्यात गरमागरम भजी आणि चहा खाताना स्वर्गसुख मिळतं, त्याप्रमाणेच गरमागरम ईराणी चहासोबत बन मस्का खाण्याची मज्जाच काही और आहे. म्हणून जसं हे कॉम्बिनेशन परफेक्ट आहे, त्याप्रमाणेच चहाची आणि बन मस्काची (Bun Maska) चवही परफेक्टच असायला हवी. तरच या जोडगोळीचा आपण भरपूर आस्वाद घेऊ शकतो. (Bun Maska)

मुंबईत अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे तुम्ही चहासोबत बन मस्का खायला जाऊ शकता. आम्ही तुम्हाला त्यांपैकीच काही सर्वोत्कृष्ट ठिकाणांची माहिती सांगणार आहोत, जिथे जाऊन तुम्ही बन मस्का आणि इराणी चहाचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग पाहुयात.. (Bun Maska)

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Pak : विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची न्यूयॉर्कमध्ये खास भेट)

  • अंधेरी स्टेशन ईस्ट

अंधेरी ईस्ट येथे स्टेशनच्या बाहेर एक काका चहाचा स्टॉल चालवतात. त्यांच्याकडे तुम्ही अगदी फ्रेश बन मस्का आणि चहाचा आस्वाद घेऊ शकता. हा स्टॉल पहाटे चार वाजल्यापासून सुरू असतो. सकाळी लोकल पकडणाऱ्यांची किंवा प्रवासातून परतणाऱ्यांची इथे चहा आणि बन मस्का खाण्यासाठी रांग लागलेली असते. (Bun Maska)

  • बी. मेरवान अँड कं. ग्रँट रोड

१९१४ सालापासून ही बेकरी ग्रँट रोड ईस्टला स्टेशनच्या बाहेर स्थित आहे. इथल्या चहाचा सुगंध बेकरी जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालतो. (Bun Maska)

तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचा चहा आणि बन मस्का खायचा असेल तर तुम्ही हे ठिकाण कधीच टाळू शकणार नाही. सर्व चहाप्रेमींसाठी चहा आणि नाश्ता करण्याचं हे उत्तम ठिकाण आहे. (Bun Maska)

  • कॅफे इराणी चाय, माहीम वेस्ट

पारंपरिक इराणी पद्धतीने सजवलेला हा कॅफे आहे. या कॅफेमध्ये आल्यानंतर इराणच्या खाद्यसंस्कृतीची ओळख होते. २०१५ साली हा कॅफे सुरू झालेला आहे. तरी इथे देण्यात येणाऱ्या चहाची चव अगदी पारंपरिक आहे. अशा चविष्ट चहासोबत फ्रेश बन मस्का खाल्ल्याने नुसतं पोटच भरत नाही तर मनही तृप्त होऊन जाते. (Bun Maska)

  • कुल्हड अँड कं. माटुंगा ईस्ट

हा इराणी कॅफे पॉकेट फ्रेंडली तर आहेच, पण इथल्या चहाची चवसुद्धा अप्रतिम आहे. इथे येणारा प्रत्येक जण पुनः पुन्हा इथे बन मस्का खाण्यासाठी आल्याशिवाय राहत नाही. इथे अप्रतिम इराणी चहासोबत मऊशार बनमध्ये भरभरून चविष्ट मस्का लावून दिला जातो. तुम्ही जर खरंच चहाप्रेमी असाल, तर तुम्हाला या ठिकाणाला एकदातरी भेट द्यायलाच हवी. (Bun Maska)

  • क्यानी अँड कं. मरिन लाईन्स

मरिन लाईन्स येथे असलेला क्यानी अँड कंपनी नावाचा इराणी कॅफे १९०४ सालापासून म्हणजे एकशे दहा वर्षांपासून इराणी खाद्यसंस्कृती जपून प्रामाणिकपणे काम करत आहे. (Bun Maska)

इथलं वातावरण अगदी शांत असतं. इथे लोकांच्या आवडीसोबतच खाद्यपदार्थाची क्वालिटीही जपली जाते. इथे चहा आणि बन मस्का तयार करण्याच्या कलात्मक पद्धतीमुळे लोक या कॅफेकडे आकर्षिले जातात. तुम्हालाही जर अप्रतिम इराणी चहा आणि बन मस्काचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या. (Bun Maska)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.