Virat Kohli : पत्रकाराने सांगितली विराट कोहलीची मैदानाबाहेरची हळवी बाजू

Virat Kohli : एका कर्करोग झालेल्या लहान मुलीला विराटने कशी मदत केली हे एका कार्यक्रमात हर्ष भोगले यांनी सांगितलं आहे 

103
Virat Kohli : पत्रकाराने सांगितली विराट कोहलीची मैदानाबाहेरची हळवी बाजू
Virat Kohli : पत्रकाराने सांगितली विराट कोहलीची मैदानाबाहेरची हळवी बाजू
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा या घडीचा सगळ्यात मोठा क्रिकेट स्टार आहे. मैदानावरील सातत्यपूर्ण कामगिरीने त्याने विक्रमांचे डोंगर रचले आहेत. अशा विराटची मैदानाबाहेरही हळवी बाजू समालोचक हर्ष भोगले (Harsa bhogale) यांनी एका खाजगी कार्यक्रमात समोर आणली आहे. मैदानावर आक्रमक असलेला आणि विजयासाठी काहीही करायला तयार असलेला विराट मैदानाबाहेर किती काळजी घेतो, याची झलक यातून दिसते. मित्राची लहान मुलगी कर्करोगाशी झगडत असताना विराटने तिच्यासाठी कसा एक व्हीडिओ संदेश पाठवला. ती बरी झाल्यावर तिची भेट घेण्यासाठी वेळ दिला हे हर्ष भोगले (Harsa bhogale) यांनी सांगितलं आहे.  (Virat Kohli)

 एका पत्रकार मित्राने विराटला (Virat Kohli) या मुलीसाठी संदेश रेकॉर्ड करण्याची विनंती केली होती. लगेचच विराटने तसा संदेश रेकॉर्ड केला. त्या मुलीची तब्येत थोडीफार सुधारल्यावर मुलीच्या इच्छेवरून विराटने तिची भेटही घेतली. ही मुलगी ऑस्ट्रेलियात होती. त्यामुळे टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघ तिथे गेला असताना मेलबर्नमध्ये या मुलीची आणि विराटची भेट झाली. विराटने तिच्याबरोबर १०-१५ मिनिटं घालवली. (Virat Kohli)

(हेही वाचा- Crime News: भारतीय तरुणाची कॅनडात गोळ्या झाडून हत्या; संशयित ताब्यात)

तरुण वर्गामध्ये विराट कोहली (Virat Kohli) खासा लोकप्रिय आहे. अलीकडेच सोशल मीडिया फॉलोअर्सच्या बाबतीत त्याने फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरलाही मागे टाकलं आहे. ट्विटरवर विराटचे ६३.६ दशलक्ष फॉलोअर आहेत. तर नेमारचे ६३.३ फॉलोअर आहेत. ३५ वर्षीय विराट कोहली (Virat Kohli) भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) खालोखाल सोशल मीडिया फॉलोइंग असलेला स्टार आहे.  (Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.