T20 World Cup, Ind vs Pak : विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची न्यूयॉर्कमध्ये खास भेट 

T20 World Cup, Ind vs Pak : ख्रिस गेल आणि कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात अनेक वर्षं एकत्र खेळले आहेत 

72
T20 World Cup, Ind vs Pak : विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची न्यूयॉर्कमध्ये खास भेट 
T20 World Cup, Ind vs Pak : विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची न्यूयॉर्कमध्ये खास भेट 
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध पाकिस्तान (T20 World Cup, Ind vs Pak) सामन्यासाठी जगभरातील क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. त्यातलाच एक होता वेस्ट इंडिजचा घणाघाती डावखुरा फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle). सामन्यापूर्वी गेल भारतीय संघाला आवर्जून भेटला. यातील विराट कोहलीबरोबरची  त्याची ग्रेट भेट विशेष गाजली. भारतीय संघाचा सराव सुरू होता. गेल तिथे आल्यावर वातावरण एकदम बदललं. सगळ्यांशी गेलने संवाद साधला. त्याचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील जुना साथीदार विराट कोहली मैदानावर आल्यावर तर दोघांमध्ये भरपूर गप्पा रंगल्या. (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Jammu Kashmir : काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये; चीन आणि पाकिस्तान यांचे संयुक्त निवेदन)

ख्रिस गेल (Chris Gayle) पांढरं जॅकेट घालून आला होता. यातल्या एका बाहीवर भारतीय राष्ट्रध्वज होता. तर दुसऱ्या बाहीवर पाकिस्तानचा ध्वज होता. या जॅकेटवर तो खेळाडूंची स्वाक्षरी घेत होता.  (T20 World Cup, Ind vs Pak)

 ख्रिस गेलवर (Chris Gayle) नजर जाताच कोहली लगेच त्याच्याकडे गेला. त्याने खास पद्धतीने त्याला मानवंदना दिली. दोघांनी हस्तांदोलन केलं. आणि गप्पाही मारल्या. भारत, पाकिस्तान दरम्यानचा सामना भारताने निसटत्या ६ धावांनी जिंकला. त्याचबरोबर ए गटात साखळीत अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय संघाचे आता अमेरिका आणि कॅनडा बरोबरचे सामने बाकी आहेत. तर पाकिस्तानने आतापर्यंत आपले दोन्ही सामने गमावले आहेत.  (T20 World Cup, Ind vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.