Sports Watch For Men : कुठल्या स्पोर्ट्स वॉचला भारतात सर्वाधिक मागणी आहे?

डिजिटल जगात फॅशन आणि उपयोग म्हणूनही स्मार्ट आणि स्पोर्ट्स वॉचना स्वतंत्र स्थान आहे. 

911
Sports Watch For Men : कुठल्या स्पोर्ट्स वॉचला भारतात सर्वाधिक मागणी आहे?
  • ऋजुता लुकतुके

स्पोर्ट्स वॉच हे तरुण आणि खासकरून पुरुषांसाठी एक स्टाईल स्टेटमेंट आहे. आणि जीपीएस, तंदुरुस्तीसाठी तसंच वेळेसाठी उपयोगी साधनही आहे. घड्याळाची किंमत, फिचर आकार आणि ब्रँड यावरून स्पोर्ट्स वॉचच्या किमती साधारणपणे ठरतात. सगळ्यात लहान ब्रँड पासून ते राडो, ॲपल यासारख्या जागतिक स्तरावरील ब्रँड्सची स्पोर्ट्स वॉच आपल्याकडे उपलब्ध आहेत. (Sports Watch For Men)

देशातील सध्याच्या ट्रेंडनुसार आंतरराष्ट्रीय ब्रँडची स्पोर्ट्स वॉच इथं बघूया,

गार्मिन फेनिक्स सीरिज ७

जबरदस्त बॅटरी लाईफ, दिमाखदार लुक सौर ऊर्जेवर चालणारं घड्याळ अशी गार्मिनची वैशिष्ट्य आहेत. आकारानेही मोठं असलेलं हे घड्याळ काही मॉडेलमध्ये एलईडी बॅकलाईटसह येतं. त्यामुळे रात्रीच्या वेळीही त्यावरील मजकूर तुम्ही अगदी सहज वाचू शकता. या घड्याळातील जीपीएस ट्रॅकिंग अगदी अत्युच्च दर्जाचं मानलं जातं. पण, हे घड्याळ तुमच्या फोनशी जोडलं जाऊ शकत नाही. त्यामुळे फोनच्या सुविधा यात नाहीत. शिवाय ते आहे अतिशच महाग. म्हणजे ४९९ अमेरिकन डॉलरपासून त्याची किंमत सुरू होते. (Sports Watch For Men)

(हेही वाचा – Sharad Pawar महायुतीचे ‘चक्रव्यूह’ भेदणार की अडकून राहाणार?)

कोरोस व्हर्टिक्स २

टिकाऊ आणि कुठल्याही वातावरणात टिकून राहील असं हे घड्याळ आहे. शिवाय बाजारातील सर्व स्पोर्ट्स वॉचमध्ये याची बॅटरी ही सगळ्यात जास्त क्षमतेची आहे. साहसी खेळ आणि साहसी ॲक्टिव्हीटी करणाऱ्या लोकांमध्ये हे घड्याळ जास्त लोकप्रिय आहे. या घड्याळाचं स्मार्ट ॲपही चांगलंच लोकप्रिय आहे. पण, या घड्याळात संगीत ऐकता येत नाही. या घड्याळाची किंमतही ४५० अमेरिकन डॉलरच्या पुढेच आहे. (Sports Watch For Men)

कोरोस पेस ३

कोरोस व्हर्टिक्स जर टिकाऊ आणि टणक वॉच असेल तर कोरोस पेस ३ हे त्याच घड्याळाचं शहरी व्हर्जन आहे. म्हणजे किंमत वाजवी असले असा प्रयत्न या घड्याळात करण्यात आला आहे. त्यामुळे घड्याळाचं वजन कमी करण्यात आलंय. तर बॅटरी मात्र जुन्याच क्षमतेची आहे. या घड्याळात स्मार्टफोनचा वापरही तुलनेनं कमी प्रमाणात करता येणार आहे. कोरोस पेस ३ ची किंमत ही अगदी १९९ अमेरिकन डॉलरपासून सुरू होते. आणि ३०९ अमेरिकन डॉलरपर्यंत ही किंमत जाते. (Sports Watch For Men)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: विविध माध्यमांतून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती, पेट्रोलियम कंपन्या करणार वैशिष्ट्यपूर्ण प्रचार; वाचा सविस्तर…)

पोलार व्हँटेज व्ही३

या घड्याळात मोबाईल फोन प्रमाणे एमोल्ड डिस्प्ले वापरण्यात आला आहे. तर या फोनचं डिझाईनही आकर्षक आणि अत्याधुनिक आहे. या फोनचा डेटा हे घड्याळाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. शिवाय यात अगदी त्वचेचं तापमानही मोजता येतं. मनगटावरील नाडी तपासून ईसीजी अहवालही हे घड्याळ देऊ शकतं. ५९९ अमेरिकन डॉलरपासून याची किंमत सुरू होते. (Sports Watch For Men)

ॲपल अल्ट्रा २

या सगळ्या स्पोर्ट्समध्ये फोन आणि घडयाळाचा चांगला संगम आणि किफायतशीर किंमत असणारं स्पोर्ट्स वॉच आहे ॲपलचं अल्ट्रा २. जीपीएस ट्रॅकिंग सुरू असताना हे घड्याळ ३५ तास चालू शकतं. यात पाणी शिरू शकत नाही. आणि या घडाळ्याचा डिस्प्ले सगळ्यात प्रखर आहे. या घड्याळाची किंमतही ३०० अमेरिकन डॉलरच्या आत आहे. (Sports Watch For Men)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.