Sports Shoes For Girls : मुलींच्या स्पोर्ट्स शूज् चे देशातील आघाडीचे ब्रँड

स्पोर्ट्स शू ची देशातील उलाढाल वार्षिक १२४ अब्ज रुपयांची आहे.

160
Sports Shoes For Girls : मुलींच्या स्पोर्ट्स शूज् चे देशातील आघाडीचे ब्रँड
  • ऋजुता लुकतुके

भारताला ऑलिम्पिक आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये पदकं मिळायला लागली तेव्हापासून देशातील ब्रँडेड क्रीडा साहित्याची बाजारपेठही विस्तारत आहे. आदिदास, नाईकी या आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी आता भारतात पाय रोवले आहेत. देशातील स्पोर्ट्स शू बाजारपेठच वर्षभरात १२४ अब्ज रुपयांची उलाढाल करते. आणि यात मुलांच्या बुटांचा वाटाही दिवसेंदिवस वाढत आहे. (Sports Shoes For Girls)

लहान मुलं आणि मुलींसाठी स्पोर्ट्स शू घेताना पालकांना वाढत्या वयाचे आणि मुलांना आरामदायी असे शू हवे असतात. जागतिक स्तरावर याबाबतीत संशोधनही झालं आहे. आणि मुलांच्या स्पोर्ट्स शूमध्ये ते आधुनिक प्रयोगही होत आहेत. जास्त आरामदायी आणि टिकाऊ होण्यासाठी मुलांच्या बुटांचे सोल हे नेहमीपेक्षा मोठे ठेवण्यात येतात. त्यात अतिरिक्त मऊपणाही असतो. (Sports Shoes For Girls)

(हेही वाचा – Sports Bike Under 2 Lakhs : ‘या’ स्पोर्ट्स बाईक आहेत ताकदीने सर्वोत्तम आणि किमतीने किफायतशीर)

भारतात उपलब्ध असलेले मुलींसाठी असलेले आघाडीचे ५ स्पोर्ट्स शू ब्रँड बघूया,

आदिदास ओरिजिनल (द ब्रिदेबल)

द ब्रिदेबल अशीच जाहिरात या शूजची केली जाते. कारण, आदिदास कंपनीचा असा दावा आहे की, यात हवा खेळली राहते. आणि त्यामुळे चिमुकल्या मुलींचे पाय लवकर थकत नाहीत. आणि घामही फारसा येत नाही. प्रो स्पार्क बास्केटबॉल शू म्हणून ते ओळखले जातात. आणि यात हलका पांढरा रंग लोकप्रिय आहे. या शू चं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य त्याचं सोल हे आहे. आणि हे सोल टिकाऊ असण्याबरोबरच चांगली पकड असणारं आहे. त्यामुळे मुली घसरून पडत नाहीत. याची किंमत मात्र ५,५०० हजारांपासून सुरू होते. (Sports Shoes For Girls)

न्यू बॅलन्स केजे ९९०व्ही४

हे शूजही अमेरिकन कंपनीनेच बनवले आहेत. आणि उंच पण, मऊ टाच हे त्याचं वैशिष्ट्य आहे. यातील सोलला उबदार करण्यासाठी त्यात अतिरिक्त कुशन देण्यात आलं आहे. हे फक्त मुलांसाठीच आणि मुलांचाच विचार करून बनवलेले शूज आहेत. धावताना किंवा खेळताना मुलं हे वापरू शकतील. तसंच शाळेतही घालू शकतील, असा कंपनीचा दावा आहे. त्यांची किंमत ८,००० रुपयांपासून सुरू होते. (Sports Shoes For Girls)

आर्मर असर्ट ९

या शूजचे सोल रबराचे आहेत. त्यामुळे मुलं पडण्याचा किंवा घसरण्याचा धोका कमी राहतो. शिवाय मुलं पडली तरी तळपायाला बसणारा मार कमी लागू शकतो. खेळताना होणाऱ्या दुखापतींचा विचार करून हे शूज कंपनीने तयार केले आहेत. हलक्या वजनाचे शूज म्हणून ते ओळखले जातात. लहान मुलांच्या वापरासाठी एकदम योग्य असले तरी रबरी सोलमुळे ते कमी टिकाऊ असण्याचा धोका आहे. त्यांची किंमत २,००० रुपये इतकी आहे. (Sports Shoes For Girls)

(हेही वाचा – Thane: होळी आणि धुलिवंदनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त, अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना? जाणून घ्या…)

आदिदास क्लाऊडफोम

फक्त लहान मुलांचा विचार करून त्यांच्याचसाठी कंपनीने बनवलेले हे शूज आहेत. हे वजनाचे फक्त जेमतेम एक किलो वजनाचे आहेत. आणि त्याला आटोपशीर लहान आकाराची शूलेस आहे. शूजचं सोल थोडं सर्वोत्तम दर्जाचं असल्याचा कंपनीचा दावा आहे. आराम आणि मुलांची सोय यांचा विचार करून त्यात स्टाईलही ॲड केलेले हे शूज आहेत. त्याची किंमत ४,००० रुपये इतकी आहे. (Sports Shoes For Girls)

एव्ही – स्टॉर्म स्नीकर्स

एव्हिया कंपनीने हे शूज खास लहान मुलींसाठी बनवले आहेत. मुलींच्या रोजच्या वापरासाठी असलेले हे कलरफुल शूज आहेत. या शूमध्येही रबर सोल आहे त्यामुळे मुलींना चालताना चांगली पकड मिळते. पण, बाजूने कंपनीने चांगलं दिसेल असं फायबर मटेरिअल वापरलं आहे. स्नीकर श्रेणीतले हे मुलींमध्ये लोकप्रिय शूज आहेत. दिवसभर पायात राहिले तरी मुलींच्या पायाला त्रास होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. त्यांची किंमतही २,००० रुपये इतकी आहे. (Sports Shoes For Girls)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.