धक्कादायक! कोरोनाकाळात वर्षभरात १ लाख भारतीयांचे मिशनरींकडून धर्मांतर! 

ज्या काळात अवघे जग कोरोना महामारीला सामोरे जात होते, त्यावेळी अनफोल्डिंगवर्ल्ड ही संस्था भारतात धर्मांतर घडवून आणण्यासाठी त्याकडे संधी म्हणून पाहत होती. या संस्थेने कोरोनाच्या २०२० या वर्षात भारतात जेवढ्या संख्येने चर्च स्थापन केले, तेवढे मागील २५ वर्षांत केले नाहीत. 

96

जगभरात मागील वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामुळे अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे, तसा भारताच्याही अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागात उपासमारीची वेळ आली, याचाच फायदा घेऊन ख्रिस्ती मिशनरींनी अशा भागात जाऊन तेथील नागरिकांना अन्न, कापडे, पैसा दिला, मात्र त्याबदल्यात त्यांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करून घेतले, अशा प्रकारे मिशनरींनी वर्षभराच्या काळात तब्बल १ लाख  भारतीयांचे धर्मांतर केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

कुणी केला खुलासा? 

  • अनफोल्डिंगवर्ल्ड या स्वयंसेवी संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिवेस यांनी हा खुलासा केला आहे.
  • ही संस्था जगभरात चर्चची स्थापना करते, तसेच बायबलचे जगभरातील भाषांमध्ये भाषांतरित करून ते जगभर पाठवत असते.
  • ‘मिशिनरी नेटवर्क न्यूज’ला मुलाखत देतांना त्यांनी डेव्हिड यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे.

(हेही वाचा : श्री मलंग गड मुसलमानांचे नव्हे, हिंदूंचे श्रद्धास्थान! काय आहे इतिहास?)

काय म्हणाले डेव्हिड रिवेस? 

  • लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहचता येत नव्हते.
  • त्यामुळे आम्ही भारतातील दुर्गम भागातील गरजूंपर्यंत मोबाईल, व्हाट्सअपद्वारे संपर्कात होतो. त्याद्वारे प्रार्थनेचे आयोजन वेळोवेळी केले जात होते.
  • अशा रीतीने मागील वर्षभरात आम्ही तब्बल १ लाख भारतीयांचे धर्मांतर करू शकलो आहोत.
  • त्याचबरोबर ५० हजार गावे ताब्यात घेतली आहेत, प्रत्येक १० गावांसाठी १ चर्चची स्थापना केली आहे.
  • त्या चर्चमध्ये आता त्या त्या भागातील लोक नियमितपणे प्रार्थनेसाठी जमतात.
  • ज्या काळात अवघे जग कोरोना महामारीला सामोरे जात होते, त्यावेळी अनफोल्डिंगवर्ल्ड संस्था भारतात त्याकडे संधी म्हणून पाहत होती.
  • कोरोनाच्या २०२० वर्षात जेवढे चर्च स्थापन केले, तेवढे मागील २५ वर्षांत केले नव्हते.
  • संस्था कोरोना महामारी म्हणजे धर्मांतराच्या कार्यासाठी येशूकडून मिळालेला आशीर्वाद समजते.

कोण आहे डेव्हिड रिवेस? 

  • डेव्हिड रिवेस हे JAARS अर्थात जंगल एव्हिएशन अँड रेडिओ सर्व्हिस या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
  • अनफोल्डिंगवर्ल्ड या संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत.
  • ही संस्था बायबलचे जगभरातील विविध भाषेत भाषांतर करते.
  • डेव्हिड यांना विश्वास आहे कि, बायबलचे अधिकाधिक भाषेत भाषांतर केल्याने मोठ्या प्रमाणात चर्चची स्थापना होणार आहे आणि येशूचा प्रसार  होणार आहे.

(हेही वाचा : श्री मलंग गडावर महाआरतीत मुसलमानांचा हैदोस!)

अशी केली जातेय चर्चची स्थापना! 

  • ‘रिच ऑल नेशन्स’ या मुख्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील छोट्या-मोठ्या मिशनरी कार्यरत आहेत.
  • या संस्थेच्या माध्यमातून ख्रिस्ती धर्मप्रसार करणे, धर्मांतर करणे याचे प्रशिक्षण दिले जाते.
  • प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक त्यांच्या गावात जातात आणि चर्चच्या स्थापनेसाठी प्रयत्न करतात.
  • त्यासाठी मिशनरी त्यांना जोवर ते स्वयंपूर्ण होत नाहीत तोवर मासिक वेतन देतात.
  • मिशनरी महिन्यातून एकदा त्यांना भेटतात, त्यांच्या कामांचा आढावा घेतात.
  • जोवर संबंधित स्वयंसेवक त्यांच्या त्यांच्या भागात चर्चची स्थापना करत नाहीत, तोवर त्यांचा पाठपुरावा करतात.
  • अशा प्रकारे भारतात चर्चची स्थापना करण्यासाठी ११० मिशनरी कार्यरत आहेत.
  • प्रत्येक मिशनरीला धर्मांतराच्या कामाचा आराखडा, लक्ष्य  दिले जाते.
  • प्रत्येक वर्षाला नवीन चर्च स्थापन करण्यास त्यांना सांगितले जाते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.