Shivaji Park : दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे महत्त्व काय आहे?

उद्यानाच्या आतील लांबी १.१७ किलोमीटर (०.७३ मैल) आहे. येथील मैदानाचे क्षेत्रफळ ११२,९३७ चौरस मीटर्स (२७.९०७ एकर) आहे, ज्यामध्ये ३१ भाडेकरू आहेत, त्यापैकी सर्वात मोठे शिवाजी पार्क जिमखाना आणि बंगाल क्लब आहेत.

223
Shivaji Park : दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कचे महत्त्व काय आहे?

मुंबईतील दादर येथे असलेले छत्रपती शिवाजी महाराज मैदान (Shivaji Park) हे सार्वजनिक उद्यान आहे. हे मुंबई शहरातील सर्वात मोठे उद्यान आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर मुंबईत झालेल्या राजकीय आणि सामाजिक संमेलनांमुळे या मैदानाला इतिहास आणि सांस्कृतिक मूल्य प्राप्त झाले आहे. ११३,००० चौरस मीटर्स (२८ एकर) खुल्या जागेत हे मैदान असून भारतातील क्रिकेट खेळाचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये क्रिकेट नेट, टेनिस कोर्ट, मल्लखांब मैदान आणि फुटबॉल खेळपट्टी अशा विविध क्रीडा सुविधा आहेत. (Shivaji Park)

खेळाव्यतिरिक्त तरुण आणि वृद्ध लोकांसाठी फिरण्याची आणि बसण्याची जागा देखील आहे. मैदानाच्या (Shivaji Park) भोवती जॉगर्स पार्क आहे. संध्याकाळी इथे प्रचंड गर्दी असते. उद्यानाच्या आतील लांबी १.१७ किलोमीटर (०.७३ मैल) आहे. येथील मैदानाचे क्षेत्रफळ ११२,९३७ चौरस मीटर्स (२७.९०७ एकर) आहे, ज्यामध्ये ३१ भाडेकरू आहेत, त्यापैकी सर्वात मोठे शिवाजी पार्क (Shivaji Park) जिमखाना आणि बंगाल क्लब आहेत. उरलेले मैदान आणि मोकळ्या जागा लोकांसाठी खेळ आणि इतर उपक्रमांसाठी उपलब्ध करुन दिली जाते. समर्थ व्यायाम मंदिर (व्यायामशाळा), शिवाजी पार्क सिटिझन्स असोसिएशन, लहान मुलांची व्यायामशाळा यासारखे अनेक उपक्रम इथे चालतात. (Shivaji Park)

(हेही वाचा – Rahul Gandhi पंतप्रधान पदाचे उमेदवार? Shiv Sena UBT ची अप्रत्यक्ष कबुली)

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्रबिंदू

ब्रिटिश राजवटीत मुंबई महानगरपालिकेने १९२५ मध्ये या उद्यानाची स्थापना केली होती. १९२७ पर्यंत ते माहीम पार्क म्हणून ओळखले जात होते. नगरपालिकेच्या नगरसेविका अवंतिका गोहकले यांच्या आदेशानुसार या मैदानाचे नाव शिवाजी पार्क (Shivaji Park) असे ठेवले. दरम्यान दादर हिंदू जिमखाना सुरु झाला आणि १९२७ मध्ये मैदानावर पहिले टेनिस कोर्ट उघडले आणि नोव्हेंबर १९३१ मध्ये पॅव्हेलियनचे उद्घाटन झाले. (Shivaji Park)

ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्यसैनिकांच्या मेळाव्याचे हे ठिकाण होते, तसेच १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळवल्यानंतर, शिवाजी पार्क (Shivaji Park) हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्रबिंदू ठरले. याच काळात दिग्गज लेखक, पत्रकार, नाटककार, कवी आणि सामाजिक नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले, या मैदानावर लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित देखील केले. सावरकरांसारख्या दैवी विभुतींनी देखील इथे भाषण केले आहे. पार्काच्या समोरच ऐतिहासिक ’स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ आहे, तसेच सावरकर सदन देखील येथेच आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे घर इथेच आहे. (Shivaji Park)

(हेही वाचा – Realme 12 plus 5g : १२ प्रो नंतर रिअलमी कंपनीची १२ प्लस सीरिज बाजारात घालतेय धुमाकूळ)

भारतीय क्रिकेटचे माहेरघर

शिवाजी पार्क (Shivaji Park) हा स्थानिक राजकीय पक्ष शिवसेनेच्या राजकीय मेळाव्यांचा अविभाज्य भाग आहे आणि इतर अनेक राजकीय मेळाव्यांचा साक्षीदार आहे. मात्र मे २०१० मध्ये, स्थानिक रहिवाशांनी राजकीय रॅली आणि मेळाव्यांमुळे परिसरातील ध्वनी प्रदूषणाबद्दल तक्रार करून सप्टेंबर २००९ मध्ये जनहित याचिका दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मैदानाला सायलेन्स झोन म्हणून घोषित केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने १२ मार्च २०२० रोजी या उद्यानाचे शिवाजी पार्कवरून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असे नामकरण केले. (Shivaji Park)

उद्यानाच्या पश्चिमेला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आहे. स्थानिक लोकांनी देणग्या गोळा करुन १९६६ मध्ये हा पुतळा उभारण्यात आला. भारतीय क्रिकेटचे माहेरघर म्हणून शिवाजी पार्कला (Shivaji Park) ओळखले जाते. येथे अण्णा वैद्य आणि रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या गुरुंनी भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू तयार केले. सचिन तेंडुलकर, अजित वाडेकर, विजय मांजरेकर, एकनाथ सोलकर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, संदीप पाटील, अजित आगरकर, प्रवीण अमरे, विनोद कांबळी, अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ या दिग्गजांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. अशा अनेक कारणांमुळे शिवाजी पार्कला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. (Shivaji Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.