Mahakali Temple: देवीभक्तांसाठी तीर्थयात्रेचे पवित्र ठिकाण कोणते? जाणून घ्या…

चंद्रपुरातील महाकाली मंदिर गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते. या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात. हे गुहा मंदिर आहे.

137
Mahakali Temple: देवीभक्तांसाठी तीर्थयात्रेचे पवित्र ठिकाण कोणते? जाणून घ्या...

आध्यात्मिक साधना करणाऱ्या साधकांसाठी महाकाली देवीची पूजा महत्त्वाची मानली जाते. महाकाली ही कलियुगातील जागृत देवता मानले जाते. काही जण तांत्रिक उपासना करणारे साधक या देवतेची पूजा करतात म्हणून महाकालीचे दर्शन घ्यायला घाबरतात, मात्र महाकाली, काळभैरव, मारुती…ही कलियुगातील जागृत दैवते मानली जातात. या देवतांची उपासना केल्यास ती लवकर फलद्रुप होते, असे म्हणतात. महाकाली देवी ही पार्वती देवीचेच रूप आहे. जाणून घेऊया, तिची थोडक्यात माहिती – (Mahakali Temple)

दश महाविद्या…
भगवान शंकराची पत्नी सती देवी. तिच्या पित्याने अर्थात दक्ष प्रजापतीने एक यज्ञ करण्याचे ठरवले होते. देवी सती आणि भगवान शशंकरांना या यज्ञाचे आमंत्रण नव्हते, कारण दक्ष प्रजापतींना भगवान शंकर जावई म्हणून आवडत नव्हता. देवी सती ही शंकराला विचारू लागली, तेव्हा शंकराने तिच्याकडे दुर्लक्ष केले. ती शशंकराकडे यज्ञाला जाण्यासाठी विनंती करू लागली. महादेवाने तिला नकार दिला, त्यामुळे सती देवी पुन्हा पुन्हा विनंती करू लागली, पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. आधीच वडिलांनी आपल्याला आणि पतीला यज्ञाला बोलावले नाही. याचा तिला राग होताच. त्यामुळे ती भयंकर संतापली आणि तिने आदीमायेचे रूप धारण केले. या रुपामुळे भगवान शंकर तिथून निघून जाऊ लागले, तर पती तिथून निघून जातो आहे, हे बघून आदीमायेने त्यांना अडवण्यासाठी १० रूपे निर्माण केली. याच ‘दश महाविद्या’ म्हणून प्रसिद्ध झाल्या. (Mahakali Temple)

भगवती काली व तारा देवी- उत्तर दिशा, श्री विद्या (षोडशी)- ईशान दिशा , देवी भुवनेश्वरी, पश्चिम दिशा .. श्री त्रिपुर भैरवी ..दक्षिण दिशा , माता छिन्नमस्ता पूर्व दिशा, भगवती धूमावती पूर्व दिशा .. बगलामुखी किंवा वलगा, दक्षिण दिशा, भगवती मातंगी वायव्य दिशा आणि माता श्री कमला नैऋत्य या दिशांची स्वामींनी अशी ही रचना निर्माण झाली. दुसऱ्या एका कथेनुसार, काही लोक असे मानतात की, एकदा शंकर आणि पार्वती यांचा संवाद सुरू होता तेव्हा काही कारणांमुळे पार्वतीला राग आला. त्यावेळी तिचे शरीर काळे पडू लागले. ते बघून शंकर तिथून जाऊ लागले तेव्हा पार्वतीने १० रूपे घेऊन त्यांना अडवले, अशी आख्यायिका सांगितली जाते. मात्र कथा-पुराणांचा भाग झाला.

‘महाकाली’ पहिली विद्या…
महाकाली ही दश महाविद्येमधली पहिली विद्या आहे. हिचा वर्ण काळा आहे. काळा म्हणजे कृष्ण वर्ण आहे. ती प्रलय काळात प्रगट होत असून ती विनाशाची देवता आहे. कालिकादेवीची ४ रूपे आहेत. दक्षिणा काली, शमशान काली, मातृ काली व महाकाली. त्यानंतर उग्र काली, काम काली आणि भद्रकाली असेही उपप्रकार आहेत. महाकालीचे रूप उग्र आहे, पण साधना करणाऱ्या साधाकासाठी ती अत्यंत कोमल मनाची आहे. साधकांचा ती सांभाळ करते.

इतिहासाची साक्ष देणारे चंद्रपूर येथील महाकाली मंदिर…
चंद्रपुरातील महाकाली मंदिर गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते. या मंदिराला वाकाटक काळाचेही संदर्भ सांगितले जातात. हे गुहा मंदिर आहे. रंगीत चित्रकला हे या मंदिराचे सर्वांत मोठे आणि अनोखे वैशिष्ट्य. अजिंठा – वेरूळ लेण्यांतील रंगीत चित्रांच्या परंपरेतील अशी चित्रकारी विदर्भात दुसरीकडे नाही. विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे चंद्रपूरचे महाकाली मंदिर. या महाकाली देवीचे संदर्भ स्कंद पुराणातही आढळतात. मध्य भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थळ म्हणून या महाकाली मंदिराचा उल्लेख होतो. वर्षभर येथे भाविकांचा राबता असतो . चैत्रात मोठी यात्रा भरते. विदर्भ, मराठवाड्यासह आंध्र प्रदेशातील भाविकांची या यात्रेला अलोट गर्दी उसळते. महाकालीची ही यात्रा ‘नांदेडची यात्रा’ म्हणूनही ओळखली जाते. चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात. महाकाली मंदिर चंद्रपुरातील गोंडकालीन इतिहासाची साक्ष देते.

(हेही वाचा – Holi Festival 2024 : धार्मिक महत्त्व आणि उत्सव साजरा करण्याची पद्धत)

एका दंतकथेनुसार,
येथील मूळ मंदिराची निर्मिती कशी झाली , याविषयी अनेक दंतकथा आहेत . एका कथेनुसार , गोंडराजा खांडक्या बल्लाळशाह ( १४७२ ते १४९७ ) हा शिकारीच्या निमित्ताने या परिसरातील जंगलात फिरत होता . फिरता फिरता तो देवीच्या या मूळ गुहेकडे आला. तेथील पाण्याने त्याने व्रण साफ केले. त्याचे व्रण नाहीसे झाले. पुढे त्याला स्वत: महाकालीने दृष्टांत दिला. स्वत : चे स्थान सांगितले. दुसऱ्याच दिवशी राजाने जंगलातील भुयारी मार्ग मोकळा केला. गुफा मोकळी केली. त्यात देवीची कोरीव मूर्ती सापडली. राजाने तेथे पहिले छोटेखानी मंदिर बांधले. आजच्या मंदिराची निर्मिती ही राणी हिराईने १७व्या शतकात केली. १७०७ ते १७०९ हा या मंदिराच्या उभारणीचा काळ. देवगडचा राजा दुर्गशाह व गोंडराजा वीरशाह (बिरसिंग) यांच्यात लढाई झाली. वीरशाहाचा पाडाव होऊ लागला होता. अचानक ‘ जय महाकाली ‘ चा जयघोष झाला . वीरशाहाच्या सैन्यात चैतन्य संचारले आणि राजा वीरशाहचा विजय झाला . महाकालीच्या कृपेनेच लढाईत विजय झाल्याचा राणी हिराईचा दृढ समज झाला . या कृतज्ञतेतून तिने मंदिराचा कायापालट केल्याचे सांगितले जाते . ही राणी हिराई ( सन १७०४ – १७१९ ) कर्तृत्ववान होती .

मंदिराच्या शिल्पकलेचे वैशिष्ट्य
महाकाली मंदिराच्या संरक्षणाची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. रामायण , महाभारतातील प्रसंग हे या मंदिराच्या शिल्पकलेतील आणखी एक वैशिष्ट्य. हे सारे शिल्प म्हणजे गोंडकालीन हस्तकलेचा उत्तम नमुना आहेत. महाकाली मंदिराला चार दरवाजे आहेत. आतील भागात कमानी आहेत. बाहेरील शिल्पांमध्ये राणीचे स्नान, राजा – राणी , मल्लयुद्ध आदी प्रसंग आहेत. एका शिल्पात मदारी पुंगी वाजवित असून समोर नाग फणा काढून आहे. एका खिडकीच्या बाजूला कोरलेल्या प्रसंगात यशोदेसमोर गवळणी एकत्र आल्या आहेत आणि त्या श्रीकृष्णाच्या तक्रारी करीत असल्याचे दिसते. आतील बाजूस गाईवरून झेप घेऊन शिकार करणारा वाघ, दोन सैन्यांतील युद्धप्रसंग, नमस्कार करीत असलेले भक्तगण, घोडेस्वार, गजस्वार, उंटस्वार आहेत . या मंदिरासंदर्भात पुरातत्त्वाचे अभ्यासक डॉ . रघुनाथ बोरकर यांनी हे गुहेतील मंदिर चवथ्या-पाचव्या शतकातील असल्याचे म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.