Madhubala: निखळ सौंदर्य, अदाकारी आणि सहजसुंदर अभिनय!

आपल्या कारकिर्दीत तिने नीलकमल आणि अमर नावाची नाटके केली तसेच अमर, महल, बादल आणि ताराना या चित्रपटांनी तिला प्रसिद्धी मिळवून दिली.

184
Madhubala: निखळ सौंदर्य, अदाकारी आणि सहजसुंदर अभिनय!
Madhubala: निखळ सौंदर्य, अदाकारी आणि सहजसुंदर अभिनय!

हिंदी चित्रपट सृष्टीमधलं “मधुबाला” (Madhubala) हे नाव माहिती नसलेली एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही. १९५० ते १९७० सालच्या दशकांत सर्वात जास्त लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे मधुबाला. मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ साली दिल्ली येथे झाला. तिचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम दहलवी असे होते. मधुबाला आठ वर्षांची असताना आपल्या पालकांसोबत मुंबईत आली होती.

मुंबईत आल्यानंतर तिने हिंदी चित्रपटांमध्ये लहान सहान भूमिका करण्यास सुरुवात केली. आपल्या निखळ सौंदर्याने, अदाकारीने आणि सहजसुंदर अभिनयाने मधुबालाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. एवढंच नाही तर जवळ जवळ वीस वर्षे तिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

(हेही वाचा – Rajya Sabha Elections : भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुळकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी)

हिट व्यावसायिक चित्रपट
आपल्या कारकिर्दीत तिने नीलकमल आणि अमर नावाची नाटके केली तसेच अमर, महल, बादल आणि ताराना या चित्रपटांनी तिला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिने मिस्टर अँड मिसेस, चलती का नाम गाडी, हाफ तिकीट, हावडा ब्रिज आणि काला पानी हे चित्रपट केले. तिचे हे सगळे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरले आणि समीक्षकांनीही तिच्या चांगल्या कामासाठी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली.

‘या’ भूमिकेने रसिकांच्या मनात घर केले
तिच्या अनेक नाटक आणि चित्रपटांपैकी मुघल-ए-आजम या काव्यात्मक ऐतिहासिक चित्रपटात साकारलेली तिची अनारकली ही भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करून राहिली आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटातल्या अनरकलीच्या भूमिकेसाठी मधुबालाला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून नामांकित केले गेले होते. ती त्याकाळची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.

नियतीपुढे कोणाचंही चालत नाही
मधुबालाचे वैयक्तिक आयुष्य तितकेसे चांगले नव्हते. तिच्या आयुष्यात पाहिलं लग्न टिकलं नाही, दुसऱ्यांदा साखरपुडा तुटला आणि तिसऱ्या लग्नाच्या आधीच तिला एका गंभीर आजाराने ग्रासलेलं होतं. लग्नानंतर दोन वर्षांतच ती देवाघरी गेली. तिचे पती किशोर कुमार हे तिचे लहानपणापासूनचे मित्र होते. ती त्यांची दुसरी पत्नी होती. किशोर कुमार यांनी मधुबालाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण नियतीपुढे कोणाचंही चालत नाही हेच खरं असतं. २३ फेब्रुवारी १९६९ साली गंभीर आजाराने मृत्यू झाला. तेव्हा तीचं वय फक्त ३६ वर्षे इतकं होतं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.