Naxalite Encounter : छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी ७ नक्षलवाद्यांना केले ठार

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या छत्तीसगडमध्ये एसओजी, डीआरजी, सीआरपीएफ, बीएसएफ आणि कोब्रा कमांडोसह सुमारे १ हजार जवानांचे पथक नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन चालवत आहे.

113
Naxalite Encounter: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी ७ नक्षलवाद्यांना केले ठार

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये २३ मे रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी ७ नक्षलवाद्यांना ठार केले. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. सध्या परिसरात सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे, दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढूही शकतो. (Naxalite Encounter)

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या छत्तीसगडमध्ये एसओजी, डीआरजी, सीआरपीएफ, बीएसएफ आणि कोब्रा कमांडोसह सुमारे १ हजार जवानांच्या पथकाचे नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. अलीकडेच कांकेर, बस्तर आणि विजापूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले. या घटनांमध्ये सुरक्षा दलाचे काही जवानही जखमी झाले आहेत. दरम्यान, इनपुटच्या आधारे या पथकांनी गुरुवारी, (२३ मे) दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांना घेरले. (Naxalite Encounter)

(हेही वाचा – Kho Kho Nationals : राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून निवडणार राष्ट्रीय स्पर्धेसाठी खो-खो संघ)

दंतेवाडा येथे नक्षलवादी लपल्याची माहिती
नारायणपूर-विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या दंतेवाडा येथे नक्षलवादी लपल्याची माहिती होती. या माहितीच्या आधारे नारायणपूर, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातील डीआरजी आणि बस्तर फायटरसह एसटीएफच्या पथकांनी शोध मोहिमेला सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान जवानांची हालचाल पाहून जंगलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. (Naxalite Encounter)

सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला
प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनीही गोळीबार सुरू केला. या गोळीबारात ७ नक्षलवादी जागीच ठार झाले, तर १० ते १२ नक्षलवादी जखमी झाल्याची बातमी आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार, दंतेवाडा एसपी गौरव रॉय आणि बस्तरचे एसपी शलभ कुमार सिन्हा हे जवानांच्या सतत संपर्कात आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.