Eastern Freeway च्या डागडुजीच्या कामांमध्ये अडीच कोटींनी वाढ, संपूर्ण पुलाच्या कामांवर तब्बल ६८ कोटींचा खर्च

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेल्या पूर्व मुक्त मार्ग अर्थात ईस्टर्न फ्री वेच्या देखभालीची जबाबदारी आता महापालिकेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

283
Eastern Freeway च्या डागडुजीच्या कामांमध्ये अडीच कोटींनी वाढ, संपूर्ण पुलाच्या कामांवर तब्बल ६८ कोटींचा खर्च

पूर्व मुक्त मार्गावरील अर्थात ईस्टर्न फ्री वेवरील (Eastern Freeway) बोगद्यापासून ते भक्ती पार्क दरम्यान असलेल्या खडबडीत काँक्रिटच्या भागाची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, या खराब झालेल्या काँक्रीटच्या भागाची दुरुस्ती करण्यासाठी हाती घेतलेल्या कामाचा खर्च तब्बल अडीच कोटी रुपयांनी वाढल्याची बाब समोर आली आहे. या पुलावरील खराब भागावर काँक्रीटद्वारे पुष्टीकरण करण्यासाठी सुमारे २७ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात याचा खर्च आणखी २.६५ कोटींनी वाढल्याने केवळ उपनगरातून जाणाऱ्या पूर्व मुक्त मार्गावरील पुलावरील खराब भागाच्या कामांसाठीचा एकूण खर्च सुमारे ३० कोटींवर पोहोचला आहे. तसेच शहर भागातून जाणाऱ्या पुलाच्या डागडुजीसाठी ३८ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे या पुलाच्या संपूर्ण डागडुजीवरच सुमारे ६८ कोटींचा खर्च केला जात आहे. (Eastern Freeway)

पूर्व मुक्त मार्ग हा शहरापासून पूर्व उपनगरांमधून जात असून पूर्व उपनगरातील महापालिकेच्या एम पूर्व आणि एम पश्चिम या महापालिकेच्या हद्दीतून जात आहे. या पूर्व मुक्त मार्गावरील काही पृष्ठभाग खडबडीत झाल्याने याचे सर्वेक्षण करण्यासाठी व्हीजेटीआय या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या सर्वेक्षणातील अहवालानुसार महापालिकेने या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली होती. त्यामुळे या पुलावरील खराब भागाची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्यावतीने एप्रिल २०२२मध्ये आर के मधानी एँड कंपनीची निवड केली होती. यामध्ये या पुलावरील भागाची डागडुजी करण्यासाठी विविध करांसह २७ कोटी ०५ लाख रुपयांच्या कंत्राट कामाला मंजुरी दिली होती. (Eastern Freeway)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेस ४० पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, अमित शहांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल)

ईस्टर्न फ्री वेच्या देखभालीची जबाबदारी आता महापालिकेच्या खांद्यावर

हे काम पावसाळ्यासह १२ महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असतानाच प्रत्यक्षात यापेक्षा अधिक कालावधी लागला. मार्च २०२२मध्ये प्रत्यक्षात कामाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात कामाला ऑक्टोबर २०२२ रोजी सुरुवात झाली. त्यामुळे हे काम ऑक्टोबर २०२३पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, त्यापेक्षा अधिक कालावधीत हे काम करतानाचा याचा खर्च तब्बल अडीच कोटींनी वाढला गेला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या पूर्व मुक्त मार्गाच्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन कंत्राटमध्ये त्यांचे प्रमाण निश्चित केले होते. परंतु हे काम सर्वेक्षणानंतर १८ महिन्यांनंतर प्रत्यक्षात सुरु करण्यात आले. या दरम्यान, या मार्गाच्या पृष्ठभागाची अधिक झीज झाली म्हणून पीएमबीएमचे प्रमाण गृहीत धरल्यापेक्षा अधिक लागत आहे. तसेच या कालावधी रस्त्यावरील उभ्या तसेच आडव्या सांध्याची रुंदीही अधिक वाढली गेली व रस्त्यावरील तडे किंवा भेगांचे प्रमाण अधिक वाढले. त्यामुळे इपॉक्सी मॉरटलचे प्रमाण वाढले गेले. (Eastern Freeway)

पीएमबीएम पेवर मशीनने काम करताना रस्त्याच्या कडेला असलेल्या डब्ल्यू मेटल क्रॅश बॅरीयरमुळे अडथळा निर्माण होत होता. शिवाय जागोजागी डब्लू मेटल क्रॅश बॅरियर हे वाहनांच्या अपघातामुळे निघाले होते. त्यामुळे दुरावस्थेत असलेले व कामात अडथळा निर्माण करणारे हे बॅरियर काढून टाकून नव्याने बसवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे कंत्राट कामांमध्ये वाढ झाल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेल्या पूर्व मुक्त मार्ग अर्थात ईस्टर्न फ्री वेच्या देखभालीची जबाबदारी आता महापालिकेच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या पुलाच्या खाबांवरील पेडेस्टलमध्ये क्रॅक आढळून आल्याने तसेच त्यावरील बेअरींग खराब झाल्याने संभाव्य मोठे नुकसान टाळण्याच्या दृष्टीकोनातून याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दुरस्तीच्या कामांवर तब्बल ३८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ईस्टर्न फ्री वे (Eastern Freeway) भाग ज्या शहर भागातून जात आहे, त्या भागाचे महापालिकेच्या पूल विभागाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर त्यामध्ये पुलाचे खांबावरील उथळ्यांचे अर्थात पेडेस्टेल मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अर्थात क्रॅक्स झाल्याचे आढळून आले. त्यामुळे खांबावरील पेडेस्टेल वरील बेअरींगही खराब असल्याचे आढळून आले. त्यामुळे हे उथळे व बेअरींगमुळे पुलाचे इतर भाग पिअर कॅप, पीएसपी सेगमेंटल बॉक्स गर्डर यांच्यावरील बांधकामाच्या ताणात वाढ होऊ मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता दिसून आली. त्यामुळे या कामांसाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करून कामाला सुरुवात केली. त्यामुळे पूर्व मुक्त मार्गावरील या डागडुजीच्या कामांसाठी एकूण सुमारे ६८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. (Eastern Freeway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.