Kho Kho Nationals : राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून निवडणार राष्ट्रीय स्पर्धेसाठी खो-खो संघ

Kho Kho Nationals : पुरुष व महिलांसाठी राज्य अजिंक्यपद स्पर्धा मंगळवेढ्यात होणार आहेत.

91
Kho Kho Nationals : राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून निवडणार राष्ट्रीय स्पर्धेसाठी खो-खो संघ
 • ऋजुता लुकतुके

पुरुष व महिला गटाची राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मंगळवेढामध्ये सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या यजमान पदाखाली होणार असल्याची माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली आहे. (Kho Kho Nationals)

पुणे इथं महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत खो खो च्या विविध राज्यस्तरीय स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा लातूर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने तर किशोर- किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मानवत (जिल्हा परभणी) या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. (Kho Kho Nationals)

राष्ट्रीय स्पर्धा साधारणपणे नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये होतील. या स्पर्धेच्या अगोदर राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात येतील. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडण्यासाठी निवड समिती सदस्य आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व फिजिओ यांची नियुक्ती सुध्दा जाहीर करण्यात आली आहे. (Kho Kho Nationals)

महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे पंच शिबीर वसमत (जिल्हा हिंगोली) या ठिकाणी ऑगस्टमध्ये आयोजित केले जाणार आहे. ज्यामध्ये खो-खो मध्ये समाविष्ट होत असलेल्या व बदल झालेल्या विविध नियमांवर चर्चा होऊन उजळणी सुध्दा घेतेली जाते. (Kho Kho Nationals)

(हेही वाचा – Dombivli MIDC Blast: मृतांचा आकडा पोहोचला ६ वर, बॉयलरचा स्फोट झाला अन्…)

निवड समित्या
 • पुरुष-महिला (खुला गट) : जगदीश दवणे (पालघर), मंदार कोळी (ठाणे), विशाल भिंगारदेवे (सांगली), गौरी भगत (सातारा).
 • कुमार-मुली (१८ वर्षाखालील) : प्रशांत कदम (सातारा), रमेश नांदेडकर (नांदेड), संदीप चव्हाण (पुणे), भावना पडवेकर (ठाणे).
 • किशोर-किशोरी (१४ वर्षाखालील) : अमोल मुटकुळे (हिंगोली), विशाल पाटील (जळगाव ), राजाराम शितोळे (सोलापूर), वर्षा कच्छवा (बीड).
संघ प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक: राष्ट्रीय स्पर्धा :
 • पुरुष गट : डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), डॉ. पवन पाटील (परभणी).
 • महिला गट : नरेंद्र मेंगळ (ठाणे),अनिल रौंदाळ (नंदुरबार).
 • फेडेरेशन चषक : पुरुष गट : पंढरीनाथ बडगुजर (धळे),
 • महिला गट : जगदीश दवणे (पालघर), विजय जाहेर (बीड)
 • कुमार गट : प्रताप शेलार (ठाणे), युवराज जाधव (सांगली),
 • मुली गट : श्रीकांत गायकवाड (मुंबई), सुप्रिया गाढवे (धाराशिव).
 • किशोर गट : विकास सूर्यवंशी (छ. संभाजीनगर), राहुल पोळ (जळगाव).
 • किशोरी गट : अतुल जाधव (सोलापूर), विकास परदेशी (अहमदनगर)
 • फिजिओ : डॉ. अमोल कुटाळे (सातारा), डॉ. अमित राव्हाटे (सांगली)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.