Narendra Modi: पंतप्रधानांनी दिली पोखरणच्या फायरिंग रेंजला भेट; तिन्ही सैन्यदलाचे शौर्य पाहून म्हणाले…

139
Narendra Modi: पंतप्रधानांनी दिली पोखरणच्या फायरिंग रेंजला भेट; तिन्ही सैन्यदलाचे शौर्य पाहून म्हणाले...
Narendra Modi: पंतप्रधानांनी दिली पोखरणच्या फायरिंग रेंजला भेट; तिन्ही सैन्यदलाचे शौर्य पाहून म्हणाले...

भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्य दलांच्या संयुक्त सरावाला ‘भारत शक्ती’ असे नाव देण्यात आले आहे. स्वदेशी संरक्षण क्षमता विकसित करण्यासाठी हा युद्धाभ्यास सुरू आहे. मेक इन इंडिया या प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचे सुमारे ५० मिनिटांचे हे सराव प्रात्याक्षिक आहे. हा सराव पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंगळवारी, (१२ मार्च) या तिन्ही सैन्यांचा संयुक्त सराव ‘भारत शक्ती’ पाहण्यासाठी राजस्थानच्या पोखरण फायरिंग रेंजवर पोहोचले.

यावेळी पंतप्रधानांनी सांगितले की, आपण तिन्ही सैन्यांचे शौर्य पाहिले. ही नवीन भारताची हाक असून ती चौफेर गुंजत आहे. पोखरण जे भारताच्या अणुशक्तीचे साक्षीदार आहे, आज इथेच आपण स्वदेशीच्या माध्यमातून आपली ताकद जगाला दाखवत आहोत. आज सर्वजण आपल्या तोफा, रणगाडे लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र प्रणालीची गर्जना ऐकत आहोत. शस्त्रास्त्रे, दारूगोळा, दळणवळणाची साधने, सायबर आणि अंतराळापर्यंत आपण मेड इन इंडियाच्या उड्डाणाचा अनुभव घेत आहोत. ही भारताची खरी शक्ती आहे.

(हेही वाचा – Mumbai Local Stations : मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलणार? केंद्राकडे प्रस्ताव सादर )

खासगी क्षेत्राचा सहभाग वाढला…
असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, ‘गेल्या १० वर्षांत देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने एकापाठोपाठ एक मोठी पावले उचलली आहेत. आम्ही धोरणाशी संबंधित अनेक सुधारणा केल्या. खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवला. एमएसएमई स्टार्टअपला प्रोत्साहन दिले. गेल्या १० वर्षांत भारताने स्वत:चे लढाऊ विमान विकसित केले. भारताने स्वत:चे विमानवाहून जहाज तयार केले. C295 वाहतूक विमानेदेखील भारतात तयार केली जात आहेत. आज आधुनिक इंजिनेही भारतात तयार होत आहेत.’

भारताचा प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबनावर भर
‘आज देशात उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण कॉरिडॉर तयार केले जात आहेत. यामध्ये आतापर्यंत 7 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक झाली आहे. आज आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर बनवणारा कारखाना भारतात कार्यरत झाला आहे. भारताच्या शक्तीचा उत्सव शौर्याची भूमी असलेल्या राजस्थानमध्ये पाहायला मिळतोय. मात्र याचा ध्वनी जगभरात ऐकू येत आहे. स्वावलंबी भारताशिवाय विकसित भारताची संकल्पना शक्य नाही. भारताचा विकास करायचा असेल तर इतरांवरील अवलंबित्व कमी करावे लागेल. त्यामुळे आज भारत खाद्यतेलापासून आधुनिक विमानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबनावर भर देत आहे,’ असंही मोदी यावेळी म्हणाले.

जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनण्याचे आश्वासन
‘येत्या काही वर्षांत जेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनू, तेव्हा भारताची लष्करी क्षमताही नवीन उंची गाठेल. भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्यात राजस्थान मोठी भूमिका बजावेल. विकसित राजस्थान विकसित सैन्यालाही तितकेच सामर्थ्य देईल. भविष्यात भारतीय लष्कर आणि भारताचे संरक्षण क्षेत्र मोठे होणार आहे. तरुणांसाठी यात अनेक रोजगारा आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. भारत एकेकाळी जगातील सर्वात मोठा संरक्षण आयातदार देश होता. भारत संरक्षण क्षेत्रात मोठा निर्यातदार बनत आहे. 2014 च्या तुलनेत भारताच्या संरक्षण निर्यातीत 8 पटीने वाढ झाली आहे,’ अशी माहितीही मोदींनी यावेळी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.