Aadhaarwadi Jail: कल्याणमधील आधारवाडी कारागृहात कैद्यांसाठी नाविन्यपूर्ण सुविधा, वाचा सविस्तर…

अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते मंगळवारी या सर्व सुविधांचे उदघाटन करण्यात आले.

140
Aadhaarwadi Jail: कल्याणमधील आधारवाडी कारागृहात कैद्यांसाठी नाविन्यपूर्ण सुविधा, वाचा सविस्तर...
Aadhaarwadi Jail: कल्याणमधील आधारवाडी कारागृहात कैद्यांसाठी नाविन्यपूर्ण सुविधा, वाचा सविस्तर...

कल्याणमधील आधारवाडी कारागृहात (Aadhaarwadi Jail) सीसीटीव्ही प्रकल्प, कॉइन बॉक्स सुविधा, व्हिडियो कॉन्फरन्स, ई मुलाखत युनिट, इ लायब्ररी या नाविन्यपूर्ण सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे कैद्यांच्या सुविधेत आणखी वाढ झाली आहे.

अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते मंगळवारी या सर्व सुविधांचे उदघाटन करण्यात आले. ‘कॉईन बॉक्स’ सुविधेअंतर्गत आठवड्याला प्रत्येक कैद्याला ३ कॉल मिळणार आहेत.

(हेही वाचा – Radhakrishna Vikhe Patil : महसूल विभागातील ब्रिटिशकालीन पदांची नावे बदलून सन्मानाची नावे देण्यात यावी)

राज्यातील जवळपास सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्यांना महिन्यातून एक वेळा कुटुंबासोबत आणि एक वेळा वकिलासोबत बोलता येणार आहे. राज्यातील जवळपास सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ईलायब्ररीमुळे ही लायब्ररी अपडेट करता येईल आणि याचा जास्तीत जास्त लाभ कैद्यांना मिळेल.

सुरक्षेच्या दृष्टीने काळजी
जेलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण जेलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेत. त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे. यावेळी जेलच्या दुरावस्थेबाबत बोलताना गुप्ता यांनी पीडब्ल्यूडी पाठपुरावा सुरू आहे, असं सांगितलं.

कारागृहाचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना…
आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत, याबाबत बोलताना अमिताभ गुप्ता यांनी पालघरला नवीन कारागृहाच्या कामाची सुरुवात झाल्याचे यावेळी सांगितले. ते काम पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि आधारवाडी कारागृहाचा ताण कमी होईल कमी होईल असेही ते यावेळी म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.