Mumbai Local Stations : मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलणार? केंद्राकडे प्रस्ताव सादर

Railway Stations Name Change : ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे नावे लवकरात लवकर बदलण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे अमित शाहांसोबत बैठक घेणार आहेत, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

532
Mumbai Local Stations : मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलणार? केंद्राकडे प्रस्ताव सादर
Mumbai Local Stations : मुंबईतील ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलणार? केंद्राकडे प्रस्ताव सादर

मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या (Railway Station) नावांत बदल करण्यासंदर्भात १२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अधिकार राज्याला आहे. ही नावे लवकरात लवकर बदलण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत बैठक घेणार आहेत. (Mumbai Local Stations)

(हेही वाचा – Radhakrishna Vikhe Patil : महसूल विभागातील ब्रिटिशकालीन पदांची नावे बदलून सन्मानाची नावे देण्यात यावी)

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) याविषयी म्हणाले की, मुंबई सेंट्रलचे नाव नाना जगनाथ शंकरशेठ हे नाव ठेवण्यात यावे, असा प्रस्ताव केंद्राला देण्यात आला आहे. किंग्ज सर्कलचं तिर्थकर पार्श्वनाथ करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. मुंबई सेंट्रल, मरीन लाईन्स, डॉकयार्ड स्टेशनची नावे बदलण्यात येणार आहेत. याशिवाय करी रोड, सॅण्डहर्स्ट रोड, डॉकयार्ड, चर्नी रोड आणि कॉटनग्रीन या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. (Mumbai Local Stations)

जनतेची भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवली – खासदार राहुल शेवाळे 

भारतीय पारतंत्र्याची ओळख पुसण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याची जनतेची मागणी होती. ही जनतेची भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवली. या मागणीला तत्त्वत: मंजुरी दिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्याचे आभार मानतो. लवकरच याबाबत मंत्रिमंडळ निर्णय करून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, असे खासदार राहुल शेवाळे याविषयी बोलतांना म्हणाले.

स्टेशनची प्रस्तावित नावे कोणती ?

  • करी रोड (curry road) – लालबाग
  • सॅण्डहर्स्ट रोड (Sandhurst Road) – डोंगरी
  • मरीनलाईन्स (Marinelines) – मुंबादेवी
  • डॉकयार्ड (dockyard) – माझगाव स्टेशन
  • चर्नी रोड (Charni Road) – गिरगाव
  • कॉटनग्रीन (cottongreen) – काळाचौकी

केंद्र सरकारने अनुमती दिल्यास स्टेशनला ही नवी नावे दिसू शकतात. (Mumbai Local Stations)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.