Iran-Pakistan Conflict : इराणचा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेच्या तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला

पाकिस्तानातील जैश-अल-अदलच्या दोन ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत.

259
Iran-Pakistan Conflict : इराणचा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेच्या तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला
Iran-Pakistan Conflict : इराणचा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेच्या तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला

इराणने मंगळवारी रात्री पाकिस्तानातील (Iran-Pakistan Conflict) बलुचिस्तानमधील सुन्नी दहशतवादी संघटनेच्या ‘जैश अल अदल’च्या (Jaish Al Adal) तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNAने ही माहिती दिली.

बलुचिस्तानातील पंजनूरमध्ये हा हवाई हल्ला (Air strike) करण्यात आला. ‘जैश अल अदल’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ले करण्यात आल्याचा दावा इराणने केला, पण अद्याप या हल्ल्याला पाकिस्तानने दुजोरा अथवा नकार दोन्हीही देलेला नाही.

(हेही वाचा – Weather Update : पारा उतरला; मुंबईकरांना हुडहुडी; पुढील काही दिवस थंडी वाढणार )

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील जैश-अल-अदलच्या दोन ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. या दहशतवादी गटाने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात इराणच्या सुरक्षा दलांवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल-हमास संघर्षावरून तणाव वाढला असतानाच इराणने पाकिस्तानमध्ये हा हल्ला केला आहे. त्यामुळे संघर्ष जास्त पेटण्याची शक्यता आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने (आयआरजीसी) पाकिस्तानातील जैश अल अदल या सुन्नी बलोच दहशतवादी संघटनेवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत.

हेही पहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.