Iran-Israel conflict : “Ali Khamenei यांचे अस्तित्वही उरणार नाही” ; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

Iran-Israel conflict : "Ali Khamenei यांचे अस्तित्वही उरणार नाही" ; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

62
Iran-Israel conflict :
Iran-Israel conflict : "Ali Khamenei यांचे अस्तित्वही उरणार नाही" ; इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

इस्रायल आणि इराण युद्धात (Iran-Israel conflict) धगधगत आहे. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहे. इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रात इस्रायलच्या दक्षिण भागातील मुख्य रुग्णालय उद्ध्वस्त झाले होते. इतर काही क्षेपणास्त्रांनी इस्रायलमधील उंच इमारती आणि इतर नागरी भागांना लक्ष्य केले. यात इस्रायलमधील ४० जण जखमी झाले. या हल्ल्यांनंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे अस्तित्वही उरणार नाही, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिला आहे. (Iran-Israel conflict)

हेही वाचा-नवी मुंबईकरांसाठी सुविधा जलदगतीने मंजूर करा; CM Devendra Fadnavis यांचे आदेश

“इराणसारख्या (Iran-Israel conflict) देशावर खामेनींसारखे हुकुमशहा राज्य करतात. इस्रायलच्या विनाशाची मोहीम ते हाती घेतात. ते आता अस्तित्वात राहू शकत नाहीत. लष्कराला सूचना दिल्या आहेत आणि लष्कराला याची पूर्ण कल्पना आहे, की सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही व्यक्ती अजिबात अस्तित्वात राहता कामा नये.” अशा शब्दांत इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी इराणला इशारा दिला आहे. (Iran-Israel conflict)

हेही वाचा- Sayajirao Gaekwad यांच्या कार्याचा दस्तऐवजीकृत इतिहास; महाराष्ट्र-गुजरात पुराभिलेखांमध्ये ऐतिहासिक करार होणार

इस्रायलच्या रुग्णालयावर इराणने हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू प्रचंड खवळले आहेत. इराणला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

“युद्धाचे काही नियम असतात. इस्रायलकडून सध्या फक्त इराणचे लष्करी तळ, अणवस्त्र प्रकल्प आणि तेल विहिरींना लक्ष्य केलं जातय. पण इराण नागरीवस्त्यांना लक्ष्य करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना मारण्याचा इराणचा प्रयत्न आहे. आता इराणला याची किंमत चुकवावी लागेल.” (Iran-Israel conflict)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.