Indian Navy : व्यापारी जहाजाचे अपहरण करणाऱ्या ३५ समुद्री चाच्यांना आणले मुंबईत

१५ मार्च रोजी जवळपास ४० तासांचे हे थरारक ऑपरेशन पार पाडले. भारतीय नौदलला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अरबी समुद्रात एमवी रुएन हे जहाज रोखण्यात आलं.

151

सोमालिया किनारपट्टीवरील एका कारवाईत भारतीय नौदलाने (Indian Navy) ३५ समुद्री चाच्यांना पकडलं आहे. या समुद्री चाच्यांना घेऊन आयएनएस युद्धनौका सकाळी मुंबईत पोहचली. त्यानंतर या समुद्री चाच्यांना मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. या ऑपरेशनने एका अपहरण केलेल्या जहाजाची सुटका केली आणि अनेक ओलिसांची सुटका केली. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये समुद्री चाच्यांना रांगेत उभे करण्यात आले. डॉकयार्डमधून, समुद्री चाच्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. भारतीय नौदलाने अलीकडेच सुमारे दोन दिवस चाललेल्या चाचेगिरीविरोधी ऑपरेशनमध्ये MV Ruen या जहाजाच्या 17 क्रू सदस्यांची सुटका केली, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

(हेही वाचा Swatantra Veer Savarkar Film : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करावा; रणजित सावरकर यांची मागणी)

१५ मार्च रोजी ४० तास सुरु होता थरार 

INS कोलकाताने पकडलेल्या 35 समुद्री चाच्यांसह 23 मार्च रोजी मुंबईला परतले आणि भारतीय कायद्यांनुसार, विशेषत: सागरी चाचेगिरी विरोधी कायदा 2022 नुसार पुढील कायदेशीर कारवाईसाठी समुद्री चाच्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले, असे नौदलाने (Indian Navy) सांगितले. बचावामध्ये सागरी कमांडोना C-17 विमानातून पॅरा-ड्रॉप केले गेले आणि खोल समुद्रावरील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये अपहरण केलेल्या व्यापारी जहाज एमव्ही रुएन आणि त्यातील 17 क्रूची सुटका करण्यात आली. पकडलेल्या समुद्री चाच्यांना नि:शस्त्र करण्यात आले. १५ मार्च रोजी जवळपास ४० तासांचे हे थरारक ऑपरेशन पार पाडले. भारतीय नौदलला (Indian Navy) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अरबी समुद्रात एमवी रुएन हे जहाज रोखण्यात आलं. या जहाजाचा वापर व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यासाठी केला जात होता. १५ मार्चला जहाजावर भारतीय नौदलाची करडी नजर होती असं त्यांनी सांगितले. ज्यावेळी समुद्री चाच्यांच्या जहाजाने आयएनएस कोलकाता या भारताच्या युद्धनौकेला पाहिले तेव्हा त्यांनी मार्ग बदलला आणि सोमालिया किनारपट्टीच्या दिशेने जाऊ लागले. लुटारुंच्या जहाजावर हत्यारासह समुद्री चाचे तैनात होते. त्यांनी नौदलाच्या युद्धनौकेवर गोळीबार सुरू केला. तेव्हा भारतीय नौदलाच्या जवानांनी चोख  प्रत्युत्तर देत समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्याची वेळ आणली असं भारतीय नौदलाने म्हटलं.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.