DRDO : स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक MPATGM ची चाचणी यशस्वी

या क्षेपणास्त्रात लाँचर, टार्गेट डिव्हाईस आणि फायर कंट्रोल युनिटचा समावेश आहे.

182
DRDO : स्वदेशी बनावटीचे अत्याधुनिक MPATGM ची चाचणी यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच (DRDO) ने राजस्थान येथे १३ एप्रिल रोजी स्वदेशी बनावटीचे सुसज्ज असे अत्याधुनिक मॅन पोर्टेबल अँटी टँक गाईडेड मिसाईल (MPATGM) वेपन डेव्हलपमेंट सिस्टमची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीमध्ये क्षेपणास्त्राची कामगिरी आणि वारहेडची कामगिरी चोख राहिली. त्यानंतर आता त्याचा लष्कराच्या शस्त्रागारात समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या क्षेपणास्त्रात लाँचर, टार्गेट डिव्हाईस आणि फायर कंट्रोल युनिटचा समावेश आहे. (DRDO)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदार जनजागृतीसाठी मुंबई ‌शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वाक्षरी मोहीम)

हे क्षेपणास्त्र मजबूत क्षमतेचे असून स्वदेशी अँटी-टँक क्षेपणास्त्र टॅन्डम हाय एक्सप्लोझिव्ह अँटी-टँक (Anti-tank) (HEAT) शस्त्राने सुसज्ज आहे, जे अत्याधुनिक एक्सप्लोझिव्ह रिऍक्टिव्ह आर्मर (ERA) चिलखत असलेल्या तख्तरबंद वाहनांना सहजपणे छेदू शकते. याचा अर्थ आजच्या काळातील कोणतेही रणगाडे किंवा चिलखती वाहन या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रातून सुटू शकत नाही. (DRDO)

(हे वाचा – Iran-Israel attack: इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यात इस्रायल यशस्वी, जी-७ नेत्यांची बैठक होणार

भारताचे स्वदेशी MPATGM क्षेपणास्त्र अत्यंत महत्त्वाचे असून त्यात अनेक विशेष वैशिष्ट्येही आहेत. 

* MPATGM क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याचे वजन १४.५० किलो आहे. लांबी ४.३  फूट आहे.

* MPATGM क्षेपणास्त्र डागण्यासाठी दोन लोकांची आवश्यकता आहे.

* MPATGM क्षेपणास्त्राची रेंज २०० मीटर ते २.५० किमीपर्यंत आहे.

* एमपीएटीजीएम क्षेपणास्त्रामध्ये टँडम चार्ज हीट आणि पेनिट्रेशन वॉरहेड्स स्थापित केले जाऊ शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.