Pakistan: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैनिकाचे कोर्ट-मार्शल, नोकरीवरून बडतर्फ करून 5 वर्षांच्या कैदेची शिक्षा

आर्मी यूनिटच्या एक्सरसाइजशी संबंधित बरीचशी गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवली होती.

196
Pakistan: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैनिकाचे कोर्ट-मार्शल, नोकरीवरून बडतर्फ करून 5 वर्षांच्या कैदेची शिक्षा
Pakistan: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैनिकाचे कोर्ट-मार्शल, नोकरीवरून बडतर्फ करून 5 वर्षांच्या कैदेची शिक्षा

पाकिस्तानसाठी (Pakistan) हेरगिरी करणाऱ्या भारतीय सैन्याच्या जवानाचे कोर्ट मार्शल करण्यात आले आहे. त्या सैनिकाला सैन्याच्या सेवेतून बडतर्फ करून ५ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

आरोपी जवान नायक रँकचा असून, तो राजपुताना रेजिमेंटच्या २२व्या बटालियनमध्ये होता. सध्या तो राजपुताना रायफल्सच्या रेजिमेंटल सेंटरमध्ये तैनात होता. कोर्टमार्शल दरम्यान, आरोपी जवानाने पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप मान्य केला आहे तसेच ऑफिशिल सिक्रेट्स ऍक्ट १९२३ अन्वये ठेवण्यात आलेले आरोप मान्य केले आहेत. आरोपी जवानाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला भारतीय लष्कराच्या जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील तैनातीपासून ते युनिटपर्यंतची माहिती दिली होती. त्याशिवाय त्याने त्याच्या आर्मी यूनिटच्या एक्सरसाइजशी संबंधित बरीचशी गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवली होती तसेच त्याने भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या रेजिमेंट्सची मुव्हमेंट, त्यांच्या फॉर्मेशनशी संबंधित माहिती तसेच फोटोग्राफसुद्धा आयएसआयकडे सोपवले होते.

(हेही वाचा – Malnutrition In Children : ठाणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन कृतीशील )

यासोबतच आरोपीने सर्व कमांडिंग ऑफिसरपासून बॅटल फॉर्मेशन कमांडरपर्यंतची यादी तयार केली होती. त्याने केलेल्या मेसेजमधून त्याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेकडे या बदल्यात पैशांची मागणी केल्याचे उघड झाले आहे. या जवानावर पहिला आरोप आर्मी अॅक्टमधील सेक्शन ६९ अन्वये ठेवण्यात आला होता. त्यामध्ये आरोपी जवानाने फेब्रुवारी २०१९ आणि एप्रिल २०२०मध्ये व्हॉट्सऍपच्या माध्यमातून कुठल्यातरी अनोळखी मोबाईल नंबरसोबत संभाषण केले आणि शत्रूला मदत होईल, अशी लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवली होती, असे त्यात म्हटले होते. याचप्रमाणे जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड-१ रँकच्या अधिकाऱ्याच्या बनावट स्टॅम्पपासून ते इतर संवेदनशील वस्तू जप्त करण्यात आल्याचा उल्लेख होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.