Army Guard : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत ‘चेंज ओव्हर ऑफ द आर्मी गार्ड’ बटालियन सोहळा

136
Army Guard : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 'चेंज ओव्हर ऑफ द आर्मी गार्ड' बटालियन सोहळा
Army Guard : राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 'चेंज ओव्हर ऑफ द आर्मी गार्ड' बटालियन सोहळा

राष्ट्रपती भवन येथे आज (11 फेब्रुवारी 2024) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या उपस्थितीत चेंज ओव्हर ऑफ द आर्मी गार्ड बटालिअन सोहळा झाला. या कार्यक्रमात, राष्ट्रपती भवन येथे सेरेमोनियल आर्मी गार्ड बटालियन (Ceremonial Army Guard Battalion) म्हणून तैनात शीख रेजिमेंटच्या 6व्या बटालियनचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, पुढील कार्यभार 5 व्या गोरखा रायफल्सच्या 1 ल्या बटालियनकडे सोपवण्यात आला. (Army Guard)

(हेही वाचा – Ashwini Vaishnaw : आता हायड्रोजनवर धावणार रेल्वे; रेल्वेमंत्र्यांची संसदेत घोषणा)

राष्ट्रपतींनी केले सैनिकांचे कौतुक

लष्करी परंपरांच्या सर्वोच्च मानकांचे पालन केल्याबद्दल आणि राष्ट्रपती भवनात पूर्ण समर्पणाने आपले कर्तव्य बजावल्याबद्दल शीख रेजिमेंटच्या 6 व्या बटालियनच्या अधिकारी आणि सैनिकांचे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात कौतुक केले. तसेच 5व्या गोरखा रायफल्सच्या 1ल्या बटालियनचे राष्ट्रपतींनी स्वागत केले आणि आपल्या 166 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाला अनुसरून ते राष्ट्रपती भवनात एक नवा मापदंड प्रस्थापित करतील असा विश्वास व्यक्त केला.

थलसेनेच्या विविध तुकड्या राष्ट्रपती भवनात सेरेमोनियल आर्मी गार्ड म्हणून आळीपाळीने कार्यरत असतात. तैनात तुकडी राष्ट्रपती भवनात औपचारिक रक्षक कर्तव्ये पार पाडण्यासोबत मान्यवरांना मानवंदना, प्रजासत्ताक दिन संचलन , स्वातंत्र्य दिन संचलन, बीटिंग द रिट्रीट सोहळा अशा विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये औपचारिक कर्तव्ये पार पाडते. (Army Guard)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.