Shyamchi Aai : कथामाला मालवणकडून ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस साजरा

अध्यक्ष स्थानावरून बोलताना पेडणेकर सर म्हणाले, आज श्यामच्या आईचा हा वाढदिवस महाराष्ट्रातून फक्त माझ्या वायंगणी गावात होत आहे, याचा मला अभिमान वाटतो.

153
Shyamchi Aai : कथामाला मालवणकडून 'श्यामची आई' पुस्तकाचा वाढदिवस साजरा
Shyamchi Aai : कथामाला मालवणकडून 'श्यामची आई' पुस्तकाचा वाढदिवस साजरा

साने गुरुजींचे ह्रदय मातृप्रेमाने एवढे भरलेले होते की, अतिशय जलद केवळ पाच दिवसांत ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) हा मातृग्रंथ कागदावर प्रकट झाला. आज प्रत्येक घरातील मातेजवळ मोबाईलऐवजी हे मातृप्रेमाचे महंमंगल स्तोत्र असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सानेगुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केले. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका समितीच्या वतीने शुक्रवारी महाराष्ट्र माऊली पूज्य साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मालवण तालुक्यातील वायंगणी ठाणेश्वर शाळेत झालेल्या या कार्यक्रमात सुरेश ठाकूर बोलत होते.

साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी सल्लागार समिती सदस्य मालवण कथामाला प्रकाश पेडणेकर हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अध्यक्ष कथामाला मालवण सुरेश ठाकूर हे होते. यावेळी कथा निवेदिका व प्रमुख कार्यकर्त्या सुगंधा गुरव यांनी ‘श्यामची आई’ पुस्तकातील ‘पुण्यात्मा यशवंत, श्रीम प्रतिभा मयेकर यांनी ‘भूतदया’, श्रुती गोगटे यांनी ‘अर्धनारी नटेश्वर’ या कथा सादर केल्या तसेच या शाळेच्या विद्यार्थिनी यज्ञवी धुळे हिने’ मनाची जडणघडण’ तर स्वरा पांजरी हिने ‘पत्रावळ’ या कथा सादर केल्या.

(हेही वाचा – Ashwini Vaishnaw : आता हायड्रोजनवर धावणार रेल्वे; रेल्वेमंत्र्यांची संसदेत घोषणा )

मातृग्रंथ कागदावर प्रकट झाला

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुरेश ठाकूर म्हणाले, गेल्या नऊ दशकात या पुस्तकाच्या १० लाखांहून जास्त प्रती वितरीत झाल्या असून १४ विविध भाषांत भाषांतर झाले आहे. साने गुरुजी यांनी ९ फेब्रुवारी १९३३ रोजी गुरुवारी रात्री लिहायला गुरुजींनी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ रोजी पहाटे मातेचा महिमा सांगणारा हा ग्रंथ पूर्णत्वास गेला. गुरुजींचे ह्रदय मातृप्रेमाने एवढे भरलेले होते की, भराभर हा मातृग्रंथ कागदावर प्रकट झाला. आज प्रत्येक घरातील मातेजवळ मोबाईलऐवजी हे मातृप्रेमाचे महंमंगल स्तोत्र असणे आवश्यक आहे.

‘श्यामची आई’ पुस्तके वितरीत

अध्यक्ष स्थानावरून बोलताना पेडणेकर सर म्हणाले, आज श्यामच्या आईचा हा वाढदिवस महाराष्ट्रातून फक्त माझ्या वायंगणी गावात होत आहे, याचा मला अभिमान वाटतो. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने माता भगिनी व पालक वर्ग उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, श्यामची आई समजून घेतली याचे मला समाधान वाटते. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना श्यामची आई पुस्तके वितरीत केली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुजींची गाणी सादर केली.या शाळेच्या मुख्याध्यापिका वैजयंती कदम यांनी उत्तम व्यवस्थापन केले. सर्वांना खाऊ वाटप केले. व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दामोदर वायंगणकर, रेडकर मॅडम, कोचरेकर सर, मुख्याध्यापिका कदम मॅडम उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोचरेकर यांनी केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.