Bangladesh News : निवडणुकीच्या काही तासांआधी हिंदू व्यावसायिकाची हत्या; कट्टरपंथीयांनी दुकानातून लाखो रुपये लुटले

Bangladesh News :      संसदीय निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवस आधी बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले आहेत.(Bangladesh News)

126
Hindu businessman Susen Chandra Sarkar in his shop.
Susen Chandra Sarkar was brutally murdered in his shop.

Bangladesh News :      संसदीय निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवस आधी बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले आहेत.(Bangladesh News) ९ फेब्रुवारीच्या रात्री, मयमनसिंग जिल्ह्यात ६२ वर्षीय हिंदू तांदूळ व्यापारी सुषेन चंद्र सरकार यांची कट्टरपंथीयांनी निर्घृण हत्या केली. हल्लेखोरांनी “भाई भाई एंटरप्राइज” नावाच्या त्यांच्या दुकानात घुसून हिंदू व्यावसायिकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला, शटर तोडले आणि पळून गेले. या घटनेमुळे निवडणुकीपूर्वी देशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.(Bangladesh News)

(हेही वाचा Road Accident : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची खैर नाही! परिवहनमंत्र्यांचे ‘मिशन रस्ते सुरक्षा’ )

मृताचा मुलगा सुजान सरकार याने सांगितले की, कुटुंबाचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते. हत्येनंतर मारेकऱ्यांनी दुकानातून लाखो रुपयेही लुटले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये सत्ता बदलल्यापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. भारतानेही या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांच्या घरांवर व व्यवसायांवर अतिरेक्यांकडून होणारे हल्ले चिंताजनक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनीही निवडणुकीपूर्वी हिंदूंच्या सुरक्षेबाबत इशारा दिला आहे.(Bangladesh News)

स्थानिक पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी सांगितले की, “रात्री ११ वाजताच्या सुमारास गुंडांनी त्यांच्यावर(सुशेन चंद्र सरकार) धारदार शस्त्राने हल्ला केला, या जीवघेण्या हल्ल्यात त्यांची हत्या झाली आणि नंतर गुंडांनी त्यांच्या दुकानाचे शटर बंद केले. कुटुंबातील सदस्यांनी शोध घेत असताना शटर उघडले तेव्हा ते रक्ताने माखलेले आढळले. त्यानंतर यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून कायदेशीर कारवाई केली जात आहे.”

बांगलादेशमध्ये १२ फेब्रुवारी २०२६ ला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. परंतु, हिंदूंवरील हिंसाचार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सार्वत्रिक निवडणुकीच्या फक्त ४८ तास आधी, बांगलादेशात आणखी एका हिंदू व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. बांगलादेशात मुहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आल्यानंतर, हिंदूंसह अल्पसंख्याकांवरील हिंसाचार वाढला आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लोक आणि अनेक मानवाधिकार संघटना संताप व्यक्त करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.