UP : धक्कादायक! निकाहाच्या मेजवानीसाठी 40 पातेल्यांमध्ये ‘गोमांस’ शिजवल्याचा आरोप; पोलिसांच्या कारवाईने खळबळ

याप्रकरणी नवरा मुलगा फरमान आणि त्याचा मामा सलमान यांना अटक

76
Large pots cooking meat at a wedding feast in UP.
AI जनरेटेड इमेज

UP : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका निकाहानंतरच्या वलीमा (मेजवानी) कार्यक्रमात, गोमांस शिजवल्याची तक्रार मिळताच, पोलिसांनी त्वरित याठिकाणी छापा टाकत कारवाई केली. उपलब्ध माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी नवरा मुलगा फरमान आणि त्याचा मामा सलमान या दोघांना अटक केली असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, हिंदू संत स्वामी यशवीर यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत, संबंधित बारातघरावर (लग्नसमारंभाची जगा/ लग्न कार्यालय) बुलडोझर कारवाईची मागणी केली आहे.

समोर आलेल्या वृत्तांनुसार, स्थानिक पोलिसांना खादर परिसरातील जंगलात, खुरगान गावाजवळ गोहत्या झाल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे गोवंशाचे अवशेष आढळून आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा: Amit Shah Kolhapur : “देश म्हणजे धर्मशाळा नाही; घुसखोरांना एक एक करुन…” अमित शाह यांचा थेट इशारा

नेमके प्रकरण काय?

प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून मिळालेले मांस भाग स्कॉर्पिओ वाहनातून शहरातील रेतावाला भागात असलेल्या ‘मुगल गार्डन’ या बारातघरात नेण्यात आले होते. या ठिकाणी वलीमाच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित बारातघरावर छापा टाकला.

पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच, घटनास्थळी उपस्थित असलेले अनेक जण तेथून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र पोलिसांनी नवरा मुलगा फरमान आणि त्याचा मामा सलमान यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वलीमासाठी ३० ते ४० मोठ्या पातेल्यांमध्ये गोमांसाचे पदार्थ तयार करण्यात आले होते.

छाप्यादरम्यान, पोलिसांनी सुमारे १० किलो संशयित गोमांस जप्त केले असून, त्यासोबत तीन चाकू, दाव (धारदार शस्त्र), कुऱ्हाड, लोखंडी रॉड तसेच इतर साहित्यही जप्त केले आहे. ज्या स्कॉर्पिओ वाहनातून मांस वाहून नेण्यात आले होते, ती गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. हे वाहन फरमानला हुंड्यात मिळाले असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात बारातघराचे संचालक हाजी अनीस यांच्यासह, शौकत गुर्जर आणि साबू कुरैशी यांनाही आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला असून, फरार आरोपींना अटक करण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे.

हेही वाचा: मुंबई लोकल बनली धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; Hindu Janajagruti Samiti चा रेल्वेला थेट इशारा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.