ISIS : ‘इसिस’ मध्ये भरती होणाऱ्या तरुणांना दिले जात होते हे तीन ‘बायथ’

साकिब नाचन हा सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान या देशातील इसिसचे ३ हँड्लरच्या थेट संपर्कात होता.

252
ISIS कडून 'शरबत सफर' या सांकेतिक शब्दाचा यासाठी केला जायचा वापर
ISIS कडून 'शरबत सफर' या सांकेतिक शब्दाचा यासाठी केला जायचा वापर

‘इसिस’ (ISIS) या संघटनेत भरती होणारी कट्टरपंथी मुस्लिम तरुणांना साकिब नाचन याच्याकडून तीन प्रकारचे ‘बायथ’ (शपथ) दिली जात होती असा खुलासा पडघा-बोरिवली (Padgha-borivali) येथून अटक करण्यात आलेल्या १५ जणांपैकी काही तरुणांनी एनआयए (NIA) जवळ केला आहे. तसेच साकिब नाचन (Saqib Nachan) हा सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान या देशातील इसिसचे ३ हँड्लरच्या थेट संपर्कात होता. त्यांच्या इशाऱ्यावरून साकिब नाचनने (Saqib Nachan) महाराष्ट्रात इसिसचे जाळे पसरविण्यास सुरुवात केली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (ISIS)

तपास यंत्रणेने पडघा-बोरीवली परिसरातून ‘या’ वस्तु केल्या जप्त 

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) व इतर तपास यंत्रणांनी महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील ४४ ठिकाणी छापेमारी करून ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ अर्थात ‘इसिस’ (ISIS) या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मॉड्युल्स उध्वस्त करून १५ जणांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. या ४४ छाप्यांपैकी ठाणे जिल्ह्यातील पडघा-बोरिवली (Padgha-borivali) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापेमारी करून इसिस या दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्र मॉड्यूलचा प्रमुख साकिब नाचनसह १५ जणांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणेने पडघा-बोरीवली (Padgha-borivali) परिसरातून मोठ्या प्रमाणात हमास देशाचे ध्वज (झेंडे), एक पिस्तुल, दोन एअर गन, आठ तलवारी सह दोन लॅपटॉप, ६ हार्डडिक्स, तीन सीडी, ३८ मोबाईल फोन, १० मॅगजीन बुक्स, ६८ लाख ३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. एनआयएने (NIA) अटक करण्यात आलेल्या साकिब नाचनसह (Saqib Nachan) १५ जणांना दिल्ली येथे नेण्यात आले असून या १५ जणांकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यांपैकी मोबाइल फोन, लॅपटॉप, राऊटर, व्हीपीएन आणि हार्ड डिस्कसह सर्व इलेक्ट्रॉनिक पुरावे एनआयएने फॉरेन्सिक लॅबकडे तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. (ISIS)

पडघा येथून अटक करण्यात आलेल्या काही संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येत असून त्यापैकी एका संशयिताने केलेल्या खुलासानुसार साकिब नाचन (Saqib Nachan) यांच्याकडून त्याचा मुलगा शमील नाचन यांच्यासह इसिसच्या महाराष्ट्र दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयीतांना जेष्ठतेनुसार तीन प्रकारची ‘बायथ’ (आयएसआयएसच्या खलिफाशी निष्ठेची शपथ) देण्यात आली होती, तसेच दुसरी शपथ घेताना इसिसचा झेंडा दाखवण्यात आला होता आणि ध्वजाच्या सोबत बंदूक ठेवून बायथ देण्यात आली होती. तिसर्‍या बायथमध्ये, ज्या व्यक्ती टेरर फंडिंग मध्ये आहेत. दहशतवादी कृत्यासाठी आर्थिक रसद पुरवत आहे अशा विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तीची ओळख उघड करायची नाही असे तिसऱ्या बायथमध्ये कबूल करून घेण्यात आले होते असा खुलासा अटकेत असलेल्या काही संशयितांनी केला आहे. (ISIS)

(हेही वाचा – Padgha NIA Raid : भिवंडीतील पडघा गाव एनआयए च्या रडारवर)

साकिब नाचन ‘या’ तीन बड्या हँडलर्सच्या संपर्कात होता 

साकिब नाचन (Saqib Nachan) हा सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान मधील इसिसच्या तीन बड्या हँडलर्सच्या थेट संपर्कात होता. सीरियातून अबू सुलतान, इराक मधून मोहम्मद उर्फ भाई आणि अफगाणिस्तानमधून अबू सुलेमान या तिघांच्या संपर्कात होता. एनआयए नुसार, व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क), टेलीग्राम, स्नॅपचॅट आणि अनेक थर्ड-पार्टी अॅप्स यासह विविध माध्यमांद्वारे नाचन त्याच्या इसिसच्या परदेशातील हँडलर्सच्या संपर्कात होता, या हँडलर्सकडून साकिब नाचणला वेळावेळी सूचना देण्यात येत होत्या, त्यांच्या इशाऱ्यावरून साकिबकडून संपूर्ण महाराष्ट्र्रात इसिसचे जाळे पसरविण्यास सुरुवात झाली होती अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. (ISIS)

‘या’ दोघांनी घेतली ऑनलाईन शपथ

रतलाम मॉड्यूलअल सुफाचे मास्टरमाइंड इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांनी साकिबकडून ऑनलाईन शपथ घेतल्याची माहिती आहे. दोन्ही फरार आरोपींनी आश्रयासाठी नाचनशी संपर्क साधला. नाचनने (Saqib Nachan) त्यांना काही दिवस पडघामध्ये आश्रय दिल्याचा आरोप आहे. नाचनने त्यांची लपण्याची व्यवस्था करण्याची आणि पुण्यात त्यांचा राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी अकीफ नाचन आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांच्यावर सोपवली अशीही माहिती समोर येत आहे. (ISIS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.