Padgha NIA Raid : भिवंडीतील पडघा गाव एनआयए च्या रडारवर

पडघा गावातील नाचन कुटुंबे दहशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

329
Padgha NIA Raid : भिवंडीतील पडघा गाव एनआयए च्या रडारवर
Padgha NIA Raid : भिवंडीतील पडघा गाव एनआयए च्या रडारवर
संतोष वाघ 
मुंबईत २००३मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट ज्या पडघा गावात शिजला होता तेच पडघा (Padgha) गाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर दहशतवादी कारवायासाठी समोर आले आहे. पडघा गावातील नाचन कुटुंबे दहशतवाद्यांना खतपाणी घालत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. २००३ मध्ये घाटकोपर आणि विलेपार्ले येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणेने साकीब नाचन याला अटक केली होती. साकीब नाचन याने पडघा गावात दहशतवादी कारवाईसाठी या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र बेकायदेशीररित्या उभे केले होते. (Padgha NIA Raid)
येथील डोंगराळ भागात स्फोटके तयार करणे, शस्त्र चालविणे, स्फोट घडवून आणणे या सारखे प्रशिक्षण या ठिकाणी दहशतवाद्याना देण्यात आल्याचे उघडकीस आले होते. साकीब नाचन हा बंदी घालण्यात आलेल्या सिमी ( स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेचा नेता होता. २००३च्या बॉम्बस्फोटात साकीब नाचन (sakib nachan) याला दोषी ठरविण्यात आले होते व त्याला १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Padgha NIA Raid)
साकीब नाचन हा शिक्षा भोगून १० वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा पडघ्यात वास्तव्य करू लागला. राज्य एटीएस आणि एनआयए ने नुकत्याच केलेल्या कारवाईत आयएसआयचे पुणे मॉड्युल उध्वस्त  करून या प्रकरणात पुणे कोंढवा, मुंबई, आणि पडघा येथून झुल्फिकार अली बडोदावाला, सिमाब नसिरुद्दीन काझी, अब्दुल कादिर पठाण, शमिल साकिब नाचन, मोहम्मद इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी आणि डॉ अदनान अली सरकार यांना अटक केली आहे.  अटक करण्यात आलेल्या पैकी झुल्फिकार, शमील साकीब नाचन आणि अकिब नाचन यांना पडघ्यातून अटक करण्यात आली. शमील नाचन हा साकीब नाचन चा मुलगा असून अकिल हा जवळचा नातलग असल्याचे समोर आले. अटक करण्यात आलेले सर्व इसिस संघटनेशी संबंधित आहे. (Padgha NIA Raid)
हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.