Mumbai Crime : तुटलेला दात आणि ८०० रुग्णालयाच्या शोधानंतर सापडला चोर

बोरिवलीच्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी या चोराचा शोध घेऊन त्याला तांत्रिकरित्या अटक करण्यात आली आहे.

22
Mumbai Crime : तुटलेला दात आणि ८०० रुग्णालयाच्या शोधानंतर सापडला चोर
Mumbai Crime : तुटलेला दात आणि ८०० रुग्णालयाच्या शोधानंतर सापडला चोर

चोरी करताना पाईपवरून पडून जखमी झालेल्या चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांना मिळालेल्या तुटलेल्या दातावरून ८०० रुग्णालय शोधल्यानंतर एका रुग्णालयात हा चोर उपचार घेत असताना मिळून आला. बोरिवलीच्या एमएचबी कॉलनी पोलिसांनी या चोराचा शोध घेऊन त्याला तांत्रिकरित्या अटक करण्यात आली आहे. या चोराचा पाय आणि मान मोडल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Mumbai Crime)

रोहित रमेश राठोड (२९) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. रोहित हा दहिसर पूर्व कोकणीपाडा येथे राहण्यास असून तो घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर संपूर्ण मुंबईत २० पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. रोहित हा इमारतीच्या ड्रेनेज पाईपच्या साहाय्याने खिडकिवाटे घरात घुसून घरफोड्या करण्यात पटाईत आहे. तो स्पायडरमॅन चोर म्हणूनही ओळखला जातो. (Mumbai Crime)

अशीच एक घटना दहीसर पश्चिम म्हात्रे वाडीत २२ जून रोजी घडली होती. अर्पिता अपार्टमेंटमध्ये एका घरात चोरी करून ड्रेनेज पाईप वरून उतरत असताना हात निसटून चोर दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. खाली पडताना भिंत तोंडाला लागून चोराचे दात पडून भिंत रक्ताने रंगली आणि त्याचा पाय आणि मानेला गंभीर दुखापत होऊन जखमी झालेला चोर त्याच अवस्थेत तेथून पळून गेला होता. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Savarkar Strategic Center : …तोपर्यंत जम्मू-काश्मिरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम ठेवा; सावरकर स्ट्रॅटिजिक सेंटरचा ठराव)

याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान पोलिसांना घटनास्थळी पडलेले दोन दात आणि भिंतीवरील रक्त मिळून आले. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोर हा खाली पडताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला व त्याला गंभीर दुखापत झाल्याचे फुटेज वरून आढळून आले. चोर कुठल्या न कुठल्या रुग्णालयात उपचार घेत असावा या अनुषंगाने पोलिस पथकाने बोरिवली, दहीसर परिसरातील सुमारे ८०० खाजगी, सरकारी रुग्णालय शोधून काढल्यानंतर चोर हा एका रुग्णालयात उपचार घेताना मिळून आला, पोलिसांना घटनास्थळी मिळून आलेले दात आणि चोराचे पडलेले दात तपासले असता दोन्ही जुळून आले व त्यावरून चोराची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी चोराला काही दिवस पोलिस निगराणीत ठेवून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याला अटक करण्यात आली आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.