POK : काश्मिरी हिंदूंचे शिरकाण करणारे ‘ऑपरेशन गुलमर्ग’ आजही चालू आहे; कॅप्टन सिकंदर रिझवी यांचे परखड उद्गार

21 ऑक्टोबरच्या रात्री पाकिस्तानने 20 हजार काश्मिरींच्या हत्या करून त्यांचे मृतदेह भारतात रेल्वेने पाठवले. या मिशनला नाव दिले गेले 'ऑपरेशन गुलमर्ग' ! हे ऑपरेशन गुलमर्ग आजही चालू आहे ! हजारो काश्मिरी पंडितांच्या त्या वेळी हत्या करण्यात आल्या. नीलम नदीच्या खोऱ्यात शारदा पिठाजवळ हे सर्व चालू होते. हा इतिहास आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांनी शिकवला नाही, असे जळजळीत वास्तव कॅप्टन सिकंदर रिझवी यांनी सांगितले.

25
POK : काश्मिरी हिंदूंचे शिरकाण करणारे 'ऑपरेशन गुलमर्ग' आजही चालू आहे; कॅप्टन सिकंदर रिझवी यांचे परखड उद्गार
POK : काश्मिरी हिंदूंचे शिरकाण करणारे 'ऑपरेशन गुलमर्ग' आजही चालू आहे; कॅप्टन सिकंदर रिझवी यांचे परखड उद्गार

फाळणी झाली, तरीही काश्मीर संस्थान अजून भारतात विलिन झालेले नव्हते. (POK) त्या वेळी सर्व प्रयत्न करूनही यश येत नसल्यामुळे वल्लभभाई पटेल यांनी तत्कालीन सरसंघचालक पूज्य गोळवळकर गुरुजी यांच्याकडे विनंती केली की, त्यांनी काश्मीरचे राजा हरिसिंह यांना भारतात संस्थान विलिन करण्यास सांगावे. त्यानुसार 18 ऑक्टोबर 1947 सायंकाळी सरसंघचालक पूज्य गोळवळकर गुरुजी काश्मीरमध्ये पोहोचले. त्या वेळी राजा हरिसिंह यांनी अडचण सांगितली की, ”आमच्या काश्मीरची हवाईपट्टी छोटी आहे. जवळचे विमानतळ लाहोरमध्ये आहे. आम्हाला दळणवळणाची अडचण आहे.” या वेळी पूज्य गोळवळकर गुरुजी यांनी काश्मीरच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. 20 ऑक्टोबरला हे बोलणे झाले, तेव्हा ती बातमी रावळपिंडीमध्ये पोहोचली. त्यानंतर 21 ऑक्टोबरच्या रात्री पाकिस्तानने 20 हजार काश्मिरींच्या हत्या करून त्यांचे मृतदेह भारतात रेल्वेने पाठवले. या मिशनला नाव दिले गेले ‘ऑपरेशन गुलमर्ग’ ! हे ऑपरेशन गुलमर्ग आजही चालू आहे ! हजारो काश्मिरी पंडितांच्या त्या वेळी हत्या करण्यात आल्या. नीलम नदीच्या खोऱ्यात शारदा पिठाजवळ हे सर्व चालू होते. हा इतिहास आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांनी शिकवला नाही, असे जळजळीत वास्तव कॅप्टन सिकंदर रिझवी यांनी सांगितले. ते ‘सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटर’ने आयोजित केलेल्या ‘पाकिस्तान्स रेप ऑफ काश्मीर’ या कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम २१ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे पार पडला. (POK)

(हेही वाचा – POK : पाकव्याप्त काश्मीरची व्यवहार्यता समजून घेणे आवश्यक – प्रा. लियाकत खान)

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, ब्रिगेडियर हेमंत महाजन, कॅप्टन संजय पराशर, कॅप्टन सिकंदर रिझवी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, पदाधिकारी राजेंद्र वराडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते. (POK)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.