Crime News : प्रियकर निघाला शाळेतील मैत्रिणीचा पती, फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल

या तक्रारीवरून माटुंगा पोलिसानी जुहू येथील बांधकाम व्यवसायिक याच्याविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

115
Crime News : प्रियकर निघाला शाळेतील मैत्रिणीचा पती, फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल
Crime News : प्रियकर निघाला शाळेतील मैत्रिणीचा पती, फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल

डेटिंग अँपवर झालेल्या ओळखीतून ४५ वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून शरीरसबंध ठेवणारा प्रियकर हा आपल्या शाळेतील मैत्रिणीचा पती निघाल्यामुळे या महिलेने प्रियकराविरुद्ध माटुंगा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि बलात्काराची तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून माटुंगा पोलिसानी जुहू येथील बांधकाम व्यवसायिक याच्याविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला ही ४५ वर्षांची आहे. फेब्रुवारी महिन्यात तीने एका डेटिंग अॅपवर बांधकाम व्यवसायिक शाह यांचे प्रोफाइल पाहिले, त्यानंतर त्यांनी एकमेकांशी बोलणे सुरू केले. त्यांची पहिली भेट माटुंगा येथील महेश्वरी उद्यान जवळ झाली. तेथून दोघेही शाह यांच्या कारने लाँग ड्राईव्हला गेले. शाह याने स्वतःला विवाहित असल्याचे पीडितेपासून लपवून ठेवले होते आणि पीडितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत बळजबरीने शरीर संबंध ठेवले. शाह यांचे लग्न झाल्याचे प्रेयसीला कळताच त्याने पत्नीला घटस्फोट देऊन पीडिते सोबत लग्नाचे अमिष दाखवून पीडितेची वेळोवेळी फसवणूक केली.

(हेही वाचा – Lalbaugcha Raja 2023 : लालबागचा राजा यंदा रायगडाच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार)

२६ एप्रिल रोजी शाह याच्या मोबाईलवरून पीडितेला फोन आला, फोन करणारी व्यक्ती शाह याची पत्नी होती. शाह याची पत्नी आपल्या शाळेतील वर्गमैत्रिण असल्याचे कळताच पीडितेला धक्काच बसला. शाहच्या पत्नीने फोन करून पीडितेला तीच्या पतीचा नाद सोड नाहीतर शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तिची बदनामी करण्याची धमकी दिली. ९ सप्टेंबर रोजी शाहने पीडितेला फोन करून माटुंगा येथे भेटण्यास सांगितले. तिने नकार दिल्यावर, त्याने तिला पोलिसांकडे न जाण्याची धमकी दिली आणि जर तिने तसे केले तर तो “तिच्या फोटोचे पोस्टर बनवेल” आणि “माटुंगा येथे बदनामी करील” अशी धमकी दिल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात बांधकाम व्यवसायिक शाह याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी देणे, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांच्या जुहू येथील जेव्हीपीडी स्कीम येथील निवासस्थानी एक पथक पाठवण्यात आले होते. मात्र, ते बेपत्ता होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.