Thane Drugs : ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; २७ कोटींचा अमली पदार्थांचा माल जप्त

ठाणे पोलिसांच्या कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये २४ जानेवारीला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून ठाणे पोलिसांच्या भूर्ने शाखा क्रमांक एकने महिन्याभरात आत्ता मलाड जयनाथ यादव उर्फ कांचा सरबहादूर सिंग आणि हुसेन सय्यद यांना अटक केली होती.

122
Thane Drugs : ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; २७ कोटींचा अमली पदार्थांचा माल जप्त

ठाणे पोलिसांकडून (Thane Drugs) तब्बल २७ कोटींचा अमली पदार्थांचा माल जप्त करण्यात आला आहे. देशात सध्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग आला आहे. अशातच ठाणे पोलिसांची ही कारवाई फार मोठी मनाली जात आहे. तसेच देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत, याच पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग आला आहे.

(हेही वाचा – Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभेवरून अजूनही धुसफूस सुरु; भाजप कार्यकर्त्यांनी केली नवी मागणी)

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी मेफेड्रोन या अमली पदार्थ सकट एका तरुणाला अटक केली होती त्याच्याकडे १५ ग्रॅम एवढ्या वजनाचे मेफेड्रोन सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीच्या मदतीने अमली पदार्थ बनवणाऱ्या एका कारखान्याचा पर्दाफाश केला.(Thane Drugs)

ठाणे पोलिसांकडून एका महिन्यात दोघांना अटक :

ठाणे पोलिसांच्या (Thane Drugs) कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये २४ जानेवारीला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करून ठाणे पोलिसांच्या भूर्ने शाखा क्रमांक एकने महिन्याभरात आत्ता मलाड जयनाथ यादव उर्फ कांचा सरबहादूर सिंग आणि हुसेन सय्यद यांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी ४८१ किलोग्राम वजनाचा चार लाख पाच हजारांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त केला. हे अमली पदार्थ मिफेड्रोन या अमली पदार्थाचे होते त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता त्यांनी हे अमली पदार्थ फरार आरोपी ओम गुप्ता उर्फ मोनू याच्याकडून घेतल्याचे कबूल केलं. (Thane Drugs)

(हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींच्या सभेत चोरांची एन्ट्री, सभेसाठी आलेल्या अनेकांचे मोबाईल फोन्स लांबवले)

ठाणे पोलिसांची उत्तर प्रदेशमध्ये वेषांतर करून कारवाई :

हा ओम गुप्ता उर्फ मोनू उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथील भगवती पुरा गावात राहतो याची माहिती पोलिसांना मिळाली यानुसार पोलिसांनी ओम गुप्ता उर्फ मोनू याला अटक करण्याकरता सापळा रचला याकरता जवळपास महिनाभर ठाणे पोलिसांचे पोलीस आणि वाराणसी पोलिसांचे पोलीस हे वेषांतर करून भगवती पुरा या गावात ठाण मांडून होते. त्यावेळेस पोलिसांना कळाले की ओम गुप्ता हा त्याच्या घरातच मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ बनवतो त्यावर ठाणे पोलिसांनी वाराणसी पोलिसांच्या मदतीने मोनू गुप्ता याच्यावर धाड टाकली. (Thane Drugs)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.