भारतविरोधी सभेसाठी जात असतांना Terrorist मौलानाची कराचीत हत्या

104
पाकिस्तानमध्ये आणखी एका भारतविरोधी आतंकवाद्याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञातांनी येथील औरंगा टाऊन भागात जैश-ए-महंमद या आतंकवादी (Terrorist)  संघटनेचा आतंकवादी मौलाना तारीक रहीम उल्लाह याला गोळ्या झाडून ठार मारले.
भारतविरोधी सभेमध्ये भाग घेण्यासाठी जात असतांना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तारिक हा पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध मौलाना  होता. त्याचे भाषण ऐकण्यासाठी हजारो लोकांची गर्दी व्हायची. पाक, ब्रिटन आणि कॅनडा या देशांमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांच्या (Terrorist) हत्यासत्रामध्ये ही २० वी हत्या असल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत पाकमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले होते. आता जैश-ए-महंमदचाही आतंकवादी मारला गेला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.