PM Narendra Modi यांच्या विरोधातील वक्तव्य अरविंद केजरीवाल, प्रियंका गांधींना भोवले

94
पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी (PM Narendra Modi) अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्ही नेत्यांना कारणे दाखवा नोटी बजावण्यात आली आहे.
भाजपा नेत्यांनी प्रियंका गांधींविरोधात तक्रार केली होती. त्यात असे म्हटले होते की प्रियंका गांधींनी मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी (PM Narendra Modi) काही वक्तव्ये केली होती. त्याला सत्याचा कुठलाही आधार नव्हता ती वक्तव्ये खोटी होती. खासगीकरणावरुन त्यांनी हे आरोप केले होते. त्यावरुन प्रियंका गांधींना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे.
त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आम आदमी पक्षातर्फे म्हणजेच आपतर्फे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओच्या विरोधात भाजपाने तक्रार केली होती. ज्यानंतर निवडणूक आयोगाने आप या पक्षालाही नोटीस बजावली आहे. १६ नोव्हेंबरच्या दिवशी संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावे असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.