Suspect Akib Nachan : संशयित अकिब नाचनला पडघ्यातुन अटक

171
Suspect Akib Nachan : संशयित अकिब नाचनला पडघ्यातुन अटक
Suspect Akib Nachan : संशयित अकिब नाचनला पडघ्यातुन अटक

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने भिवंडी तालुक्यातील पडघा येथून अकिब नाचन या संशयिताला शुक्रवारी (४ ऑगस्ट) अटक केली आहे. अकिब नाचन याने यापूर्वी एनआयएने अटक केलेल्या जुल्फिकार बडोदावाला आणि जुबेर नूर मोहम्मद शेख यांना राहण्यासाठी पडघ्यात भाड्याने घरे घेऊन दिले होते, असे एनआयएच्या तपासात समोर आल्यानंतर अकिब याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

एनआयएने मागील महिन्यात इसिस संघटनेचे संबंधित मुंबईतील नागपाडा येथून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील जुबेर नूर मोहम्मद शेख उर्फ अबू नुसैबा आणि ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. एटीएस आणि एनआयएने पुणे, ठाणे आणि मुंबईतून अटक करण्यात आलेल्या संशयितांचे एकमेकांशी असलेले संबंध समोर आले असून, हे दोन्ही इसिसने तयार केलेले मॉड्युल आहेत. या दोन्ही मॉड्युलला इसिसने दोन वेगवेगळी नावे दिली होती.

जुल्फिकार याला पडघ्यातुन अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत पडघा येथे जुल्फिकार याला राहण्याची जबाबदारी अकिब नाचन याच्यावर होती व त्याने जुल्फिकार आणि पुण्यातून अटक करण्यात आलेल्या जुबेर नूर मोहंमद शेख यांना भाड्याने घरे घेऊन दिले होते. एनआयएच्या तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारे एनआयएने तपास सुरू केला होता, दरम्यान शुक्रवारी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अकिब नाचन याच्या पडघ्यातील घरी छापेमारी करत त्याला अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Veterinary College : पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा बेमुदत संप)

पडघ्यात पुन्हा दहशतवाद्यांच्या हालचाली….

एनआयएच्या छापेमारीमुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळ असणारे पडघा गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एनआयएने मागील महिन्यात पडघा येथून दोघांना अटक केली होती व शुक्रवारी ही अकिब नाचन याची तिसरी अटक आहे. २००२ आणि २००३ साली मुंबईतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, विलेपार्ले आणि मुलुंड येथे झालेल्या बॉम्बस्फोटा प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पडघ्यातुन साकिब नाचनला अटक केली होती.

नाचन याच्या अटकेमुळे पडघा गाव हे पहिल्यांदाच चर्चेत आले होते. पडघा येथे असलेल्या डोंगराळ भागात दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे समोर आले होते. साकीब नाचन याला अटक केल्यानंतर दहशतवाद प्रतिबंधक कायदा (पोटा) अंतर्गत शस्त्रे बाळगल्याबद्दल नाचनला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला न्यायालयाने दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात होती. तुरुंगातून सुटल्यानंतर नाचन आपल्या नातेवाईकांसह पडगा या मूळ ठिकाणी पुन्हा राहण्यास आला होता.

कोण आहे अकिब नाचन …..

अकिब नाचन हा भिवंडी तालुक्यातील पडघा जवळ असणाऱ्या बोरीवली गावात राहणारा आहे. बोरिवलीत त्याचा आलिशान बंगला आहे. ८ ते ९ कोटी रुपये खर्च करून त्याने हा बंगला उभा केला आहे. त्याच्या या बंगल्यामुळे तो पडघा बोरिवलीत चर्चेत होता. दरम्यान, मे २०२२ मध्ये त्याला गुजरात एटीएसने त्याला अटक केली होती. अकिब हा बांधकाम व्यवसायिक असल्याचे समजते तसेच रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन याचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे.

१५ मे २०२२ रोजी गुजरात एटीएसने त्याला नाशिक येथील एका ढाब्यावरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर दिल्ली एनआयएने त्याचा ताबा घेतला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये मध्य प्रदेशातील रतलाम येथून दिल्ली एनआयएने अटक करण्यात आलेल्या अमीन फावडा याच्या घरी अकिब गेला होता. यानंतर ते दोघे इम्रान खान याच्या रतनामच्या पोल्ट्री फार्मला गेले, अकिब, अमीन आणि इम्रान यांनी रतनाम मध्ये दोन दिवसीय बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते अशी माहिती समोर आली होती. गरीब कुटुंबातून आलेला अकिब नाचन अचानक एवढा श्रीमंत कसा झाला याबाबतचे गूढ अद्याप उकलले नसले तरी तो स्वतःला बांधकाम व्यवसायिक सांगत आहे. या व्यवसायातून त्याने संपत्ती उभी केल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.