EOW : सुजित पाटकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी

104

कोव्हिड जम्बो सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना गुरुवारी अटक केली आहे. पाटकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सुजित पाटकर यांना ईडीने मनी लाॅंडरिंगच्या गुन्ह्यात अटक केली होती, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात पाटकर यांचा न्यायालयाकडून ताबा घेऊन अटक करण्यात आली. तत्पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक टाळण्यासाठी पाटकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायालयाने तो फेटाळून लावला होता.

(हेही वाचा Islam : ‘इस्लाम स्वीकारा नाहीतर..’ बेंगळुरूमध्ये सेक्सटॉर्शन रॅकेट चालवताना मॉडेल करायची धर्मांतर)

पाटकर यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारावर लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस साठी करार केला होता. पाटकर हे लाईफ लाईन हॉस्पिटलच्या भागीदारापैकी एक होते, व त्यांनी कोरोना काळात कोरोना उपचार केंद्रासाठी कंत्राट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोव्हिड सेंटर या ठिकाणी दाखविण्यात आलेले कर्मचारी देखील बोगस होते.

महानगर पालिकेकडून कंत्राट मिळवण्यासाठी ‘लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस’ने खोटी कागदपत्रे सादर केली आणि मुंबई महानगर पालिकेची ३६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती,निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपांनंतर, आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपाया आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. त्यानंतर या प्रकरणात ईडीकडून तपास करून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून पाटकर आणि अन्य आरोपींना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.