Islam : ‘इस्लाम स्वीकारा नाहीतर..’ बेंगळुरूमध्ये सेक्सटॉर्शन रॅकेट चालवताना मॉडेल करायची धर्मांतर

129

कर्नाटक पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणात मुंबईतून एका मॉडेलला अटक केली आहे. या टोळीने पीडितेला इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि खतना करण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. ही घटना बेंगळुरूमधील पुट्टेनहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. नेहा उर्फ मेहर असे अटक केलेल्या मॉडेलचे नाव असून प्राथमिक तपासात ती या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे. नेहा उर्फ मेहर टेलिग्रामद्वारे बेंगळुरूमधील २० ते ५० वयोगटातील व्यक्तींच्या संपर्कात होती. ती त्यांना जेपी नगर पाचव्या टप्प्यातील राहत्या घरी शारीरिक संबंध ठेवण्याचे आमिष दाखवले. तिच्या घरात प्रवेश करताच ती त्यांना बिकिनी घालून आत बोलवायची. त्यानंतर ती मॉडेल पीडितांना इस्लमामध्ये धर्मांतर करायला भाग पाडायची.

खासगी प्रसंगांचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे 

या टोळीने खाजगी प्रसंगांचे फोटो आणि व्हिडिओ काढले, नंतर ही टोळी घरात घुसून पीडित मुलाचे फोटो आणि व्हिडिओ काढत असे. टोळीतील सदस्य पीडित व्यक्तीचा मोबाईल हिसकावून, सर्व संपर्क नोंदवून घेत असत. जर ते पैसे देत नसतील तर ते त्यांचे खाजगी व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या सर्व संपर्कातील लोकांना पाठवण्याची धमकी देत असत.

(हेही वाचा Terrorism : युपी एसटीएफने उधळून लावला पाकिस्तानी दहशतवाद्याचा जिहाद पसरवण्याचा कट)

इस्लाम धर्म स्वीकारा आणि मॉडेलशी लग्न करा

ते पीडित व्यक्तीला मॉडेलशी लग्न करण्याची मागणी करायचे. ती मुस्लिम असल्यामुळे तिच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारावा असा ते आग्रह धरायचे. पीडितांची ताबडतोब सुंता करून घ्यावी, असाही त्यांचा आग्रह असे. या मागण्यांमुळे पीडित घाबरून आरोपींना मोठमोठ्या रकमा देत असत.

पीडितांनी तक्रार केली

पीडितांपैकी एकाने हिंमत दाखवून पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर टोळीपासून त्यांची मुक्तता झाली. या टोळीने १२ जणांकडून अशा प्रकारे खंडणी वसूल केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या टोळीचा आणखी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी शरणा प्रकाश बालिगेरा, अब्दुल खादर आणि यासीन यांना अटक केली. पोलिसांनी आणखी एका आरोपी नदीमचा शोध सुरू केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.