Suicide : जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या; मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल

69
Suicide : आयआयटी मुंबईत धक्कादायक प्रकार; दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या
  • प्रतिनिधी

Suicide          मुंबईतील राज्य सरकारच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या सर ज. जी. (जे. जे.) समूह रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयातील क्ष-किरणशास्त्र (Radiology) विभागात कार्यरत असलेल्या एका २६ वर्षीय निवासी डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून निवासी डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डॉ. अभयसिंह मोरे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या निवासी डॉक्टरचे नाव आहे. ते मूळचे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दहिफळ (दासेमगाव) येथील रहिवासी होते. जे. जे. रुग्णालय परिसरातील परिचारिका वसतिगृहाच्या (Nursing Hostel) सहाव्या मजल्यावरील रूम नंबर ६०४ मध्ये ते राहत होते. (Suicide)

(हेही वाचा – Mumbai Firing Case : मुंबई पुन्हा गोळीबाराने हादरली; भायखळ्यात तरुणावर भररस्त्यात फायरिंग, परिसरात खळबळ)

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अभयसिंह यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून पदभार स्वीकारला होता. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या विभागात कामावर हजर झाले नाहीत. बराच वेळ होऊनही ते न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांना शंका आली. दुपारी काही सहकारी त्यांना पाहण्यासाठी वसतिगृहातील त्यांच्या खोलीवर गेले असता, तिथे अभयसिंह यांनी गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Suicide)

(हेही वाचा – Kalyan Crime : पूजा-पाठाच्या बहाण्याने १५ वर्षीय मुलीवर अत्याचार; खडकपाडा पोलिसांनी ठोकल्या शाहिद शेखला बेड्या)

डॉ. अभयसिंह हे गेल्या काही महिन्यांपासून तीव्र मानसिक तणाव आणि नैराश्याचा (Depression) सामना करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही सुरू होते. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जे. जे. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची (ADR) नोंद केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. अभयसिंह यांच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. (Suicide)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.