
-
प्रतिनिधी
पश्चिम उपनगरातील विलेपार्ले येथे असणाऱ्या साठ्ये कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थीनीचा मृतदेह गुरुवारी सकाळी कॉलेजच्या आवारात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या विद्यार्थीनीने कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी केला आहे. प्रथमदर्शनी विलेपार्ले पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून कॉलेज परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे. (Suicide Case)
(हेही वाचा – HSRP Number Plate ला तिसऱ्यांदा मुदतवाढ; वाहनधाकरांसाठी ‘ही’ शेवटची संधी)
संध्या पाठक असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. संध्या ही नालासोपारा येथे राहण्यास असून साठ्ये कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार संध्या ही नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ७ वाजता कॉलेजमध्ये आली होती. तिचा वर्ग पहिल्या मजल्यावर होता. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कॉलेजच्या आवारात काही तरी पडण्याचा आवाज आला. कॉलेजच्या वॉचमनने आणि कर्मचाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्या ठिकाणी संध्या ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. (Suicide Case)
(हेही वाचा – वर्धापन दिनीच Shiv Sena UBT ला जोरदार धक्का; मुंबई, ठाणे, गोव्यातून अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश)
कॉलेज कर्मचारी आणि प्राध्यापकांनी तात्काळ तिला बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली असता संध्याने कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांना घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. प्राथमिक माहितीवरुन विलेपार्ले पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून कॉलेज परिसरात बसविण्यात आलेले सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन ते तपासण्यात येत आहे. दरम्यान संध्या पाठक यांच्या कुटुंबियांनी संध्या आत्महत्या करू शकत नाही, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Suicide Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community