Sexual Abuse : अभिनेता शरद कपूरने एका रिल्सस्टार तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

171
Sexual Abuse : अभिनेता शरद कपूरने एका रिल्सस्टार तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप; गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी

अभिनेता शरद कपूर यांच्यावर एका सोशल मीडियावर रिल्सस्टार असलेल्या एका तरुणीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करून खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खार पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून अभिनेता शरद कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी ही रिल्सस्टार असून विविध सोशल मीडियावर ती स्वतःचे रिल्स तयार करून पोस्ट करते, या तरुणीचे हजारो फॉलोअर्सवर आहेत. अभिनेता शरद कपूरने फेसबुकवर तिचे रिल्स बघून तिच्याशी संपर्क साधल्याचा या तरुणीचा दावा आहे. त्याने अभिनेता शरद कपूर असल्याचे या तरुणीला सांगितले, तो अभिनेता शरद कपूर असल्याची खात्री करण्यासाठी या तरुणीने त्याला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितला, शरद कपूरने तिला व्हिडीओ कॉल करून शरद कपूरच असल्याची ओळख पटवून दिली. (Sexual Abuse)

(हेही वाचा – Gujarat ATS: २०० रूपयांसाठी देशासोबत गद्दारी; पाकिस्तानी गुप्तहेराला गुजरातमधून अटक)

रिल्स स्टार तरुणीच्या म्हणण्यानुसार, शरदने तिला सांगितले की मला तिच्याशी शूटिंगच्या संदर्भात काहीतरी बोलायचे आहे आणि अशा परिस्थितीत त्यांनी तिला फोनवर लोकेशन पाठवले आणि तिला खार येथील त्याच्या कार्यालयात बोलावले. जे त्याचे कार्यालय नव्हते तर त्याने तिला घरी बोलावून घेतले होते. तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात ती खारमधील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शरदच्या घरी पोहोचली तेव्हा शरद किचनमधून बेडरूममध्ये गेला आणि नंतर तिला फोन करून बेडरूममध्ये बोलावले. ती बेडरूमच्या दारात गेली तेव्हा शरद कपूर हा विवस्त्र अवस्थेत बसलेला दिसला आणि अशा स्थितीत तरुणीने त्याला कपडे घालण्यास सांगितले. दरम्यान, अशा परिस्थितीत शरदने तिला मिठीत येऊन चुंबन घेण्यासाठी सांगून अचानक शरदने तरुणीला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला आणि तिला पाठीमागून मिठीत घट्ट पकडले. (Sexual Abuse)

(हेही वाचा – शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणे, आमचा नैसर्गिक हक्क : Sanjay Shirsat यांचं वक्तव्य चर्चेत)

या तरुणीने शरदला धक्का देऊन बाजूला लोटून तेथून पळ काढला आणि थेट खार पोलीस ठाणे गाठून अभिनेता शरद कपूर विरोधात तक्रार दाखल केली. या तरुणीच्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर खार पोलिसांनी अभिनेता शरद कपूर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ (स्त्रीचा विनयभंग करण्यासाठी बळाचा वापर करणे), कलम ७५ (महिलेचा शारीरिक आणि भावनिक त्रास देणे) आणि कलम ७९ (महिलेच्या विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद कपूर यांनी शाहरुख खानसोबत ‘जोश’ या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय तो गोविंदासोबत ‘क्यूंकी मैं झूठ नहीं बोलता’ आणि ९० च्या दशकातील लोकप्रिय मालिका ‘स्वाभिमान’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. (Sexual Abuse)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.