शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणे, आमचा नैसर्गिक हक्क : Sanjay Shirsat यांचं वक्तव्य चर्चेत

88
शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणे, आमचा नैसर्गिक हक्क : Sanjay Shirsat यांचं वक्तव्य चर्चेत
शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणे, आमचा नैसर्गिक हक्क : Sanjay Shirsat यांचं वक्तव्य चर्चेत

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता 8 दिवस झाले, पण अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. विशेष म्हणजे भाजप महायुतीला 237 जागांसह मोठं बहुमत मिळालं आहे. त्यामध्ये, भाजपने 132 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटाला 57 जागा जिंकता आल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या असून सध्या तिन्ही पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या गावी गेले असून भाजप नेते पक्षाच्या पदाधिकारी व आमदाराच्या बैठकी घेत आहेत. त्यामुळे, महायुतीच्या (Mahayuti) मुख्यमंत्रीपदाचा (Maharashtra CM) चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

हेही वाचा- Indian Territory: पाकिस्तानी तरुण चुकून भारतीय हद्दीत घुसला आणि…

अशातच, शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. संजय शिरसाट यांनी शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणे, आमचा नैसर्गिक हक्क असल्याचं म्हटलं आहे. संजय शिरसाट म्हणाले, जे देतोय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. लाडकी बहीण योजना जाहीर करताना अर्थ खात्याने थोडा विरोध केला होता. 1500 ते 2100 करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मान्यता मिळाली हवी. या खात्याचा कारभार देखील सक्षम माणसाकडे जायला हवा, असे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले.

वारंवार भिजल्याने सत्ता येतेच अशी नाही
विरोधकांच्या हातात आता सामूहिक आत्महत्या करण्यापलीकडे काहीही उरलेले नाही. एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्यापेक्षा महाराष्ट्रात खास करून गावी दरेला जातात, तिथून आल्यानंतर पक्षासाठी योग्य तो निर्णय घेतात. ईव्हीएमबाबत जे प्रश्न उपस्थित करत आहेत, तो त्यांचा पराभवानंतरचा केविलवाणा प्रयत्न आहे. राम शिंदेबाबत बोलायचं झालं तर कर्जत जामखेडमध्ये दमदाटीचं राजकारण झालं. शरद पवार ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करत आहेत. एकदा पावसात भिजल्याने सत्ता आली. वारंवार भिजल्याने येतेच अशी नाही, अशी खोचक टीका संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली.

हेही वाचा- Cheetah Corridor: तीन राज्यांना मिळून बनणार देशातील सर्वात मोठा चित्ता कॉरिडॉर!

“राज्याचा मुख्यमंत्री कोण? याचं उत्तर अद्याप कोणालाच सापडलेलं नाही. मुख्यमंत्री दरे गावी जात असतात. मोठा निर्णय घेण्यासाठी दरेगाव त्यांचं आवडीचं ठिकाण आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी परखडपणे सांगितलं आहे की, सरकार स्थापन करण्यात माझा अडसर नाही. वरिष्ठ नेत्यांचा निर्णय पक्ष आणि मी बांधील असल्याचं स्पष्ट वक्तव्य केलं आहे . दिल्लीतील बैठकीत देखील त्यांनी ते सांगितलं आहे. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणाला मुख्यमंत्री करावं हा निर्णय मोदी आणि अमित शहा यांनी घ्यावा. का वेळ लागतोय याची कल्पना नाही.” असं शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.