Delhi Liquor Scam : ईडीच्याच वरिष्ठ अधिका-याला भ्रष्टाचारप्रकरणी अटक, सीबीआयने केली मोठी कारवाई

दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील एका आरोपीकडून मदतीच्या नावाखाली 5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप

129
Delhi Liquor Scam : ईडीच्याच वरिष्ठ अधिका-याला भ्रष्टाचारप्रकरणी अटक, सीबीआयने केली मोठी कारवाई
Delhi Liquor Scam : ईडीच्याच वरिष्ठ अधिका-याला भ्रष्टाचारप्रकरणी अटक, सीबीआयने केली मोठी कारवाई

सीबीआयने 28 ऑगस्ट, सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या सहाय्यक संचालकांसह अन्य 6 अधिकाऱ्यांना अटक केली. या सर्वांवर दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील (Delhi Liquor Scam) एका आरोपीकडून मदतीच्या नावाखाली 5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री, नितेश कोहर (अप्पर डिव्हिजन क्लर्क), दीपक सांगवान (एअर इंडिया कर्मचारी), अमनदीप सिंग धल्ल, बिरेंदर पाल सिंह, प्रवीण कुमार वत्स (सनदी लेखापाल) आणि विक्रमादित्य (क्लेरिजेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे सीईओ) यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Shri Ganesh Murti आगमन–विसर्जन मार्गांवरील खड्डे आठवडा भरात बुजवा!)

दिल्ली मद्य धोरण घोटाळा (Delhi Liquor Scam) प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी मद्य व्यावसायिक अमनदीप सिंग धल्ल यांनी 5 कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य ६ अधिकाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) अटक केली आहे. यामध्ये ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री, अप्पर डिव्हिजन क्लर्क नितेश कोहर, एअर इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक दीपक सांगवान, अमनदीप सिंग धल्ल, त्याचे वडील बिरेंदर पाल सिंह, सनदी लेखापाल प्रवीण कुमार वत्स आणि क्लेरिजेस हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे सीईओ विक्रमादित्य यांचा समावेश आहे. या सर्वांच्या विरोधात सीबीआयने भादंवि कलम १२० बी (गुन्हेगारी कट) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने ६ ठिकाणी अन्वेषण केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रथम ईडीचा कोणताही आरोपी दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणाच्या तपासात सहभागी नव्हता; परंतु झडतीदरम्यान त्यांच्याकडून प्रकरणाशी संबंधित काही साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) हे प्रकरण ताब्यात घेतले. त्यात आरोप होता की, सिंग यांनी दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात धल्ल यांना डिसेंबर 2022 पासून 50 लाख रुपयांच्या टप्प्यात 5 कोटी रुपयांची लाच दिली आहे.

ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाखाली पैसा उकळणे सुरू

दिल्ली मद्य धोरण घोटाळा (Delhi Liquor Scam) प्रकरणाच्या सीबीआयच्या तपासात काही लोक ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. बिरेंदर पाल सिंग हे या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने अटक केलेल्या अमनदीप सिंग धल्लचे वडील आहेत. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत अनेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अमन धल्ल आणि बिरेंदर पाल सिंग यांनी ईडीला मदत करण्याच्या बदल्यात प्रवीण वत्स यांना ५ कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी सनदी लेखापाल प्रवीण वत्स यांनी सांगितले की, एअर इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक दीपक सांगवान यांनी त्यांना आश्वासन दिले होते की, अमनदीप सिंग धल्ल याना मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मदत मिळेल. त्यामुळे अमन याना अटक होणार नाही. दीपक यांनी या प्रकरणात काही पैसेही घेतले होते. दीपकने प्रवीण यांची ओळख 2022 मध्ये ईडीचे सहाय्यक संचालक असलेले पवन खत्री यांच्याशी करून दिली.

पवन खत्री यांच्या घरातून 2.19 कोटी रुपये जप्त

दीपकने सांगितल्यानुसार प्रवीण वत्स यांनी अमन यांच्याकडून 3 कोटी रुपये घेतले. ही रक्कम डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान 50-50 लाखांच्या 6 हप्त्यांमध्ये देण्यात आली. अमनने हे पैसे प्रवीणच्या घरी पाठवले होते. सीबीआयच्या झडतीदरम्यान प्रवीणच्या घरातून 2.19 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. याशिवाय दीपक सांगवान यांच्या घरून ६ जानेवारीला घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या पुरवणी तक्रारीची ९९ पाने प्राप्त झाली होती. त्यावरून दीपक ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे घेत असल्याचे उघड झाले. ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांच्या घरी उर्वरित कागदपत्रे सापडली आहेत.

ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांना प्रकरणात अवाजवी रस

ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांच्या परिसरातून घोटाळा प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे देखील सापडली. त्याद्वारे पवन खत्री हे या प्रकरणात अवाजवी रस घेत असल्याचे दिसून येते, असा आरोप सीबीआयने दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. ईडीने गोळा केलेल्या बैठकीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दीपक सांगवान, प्रवीण वत्स, पवन खत्री आणि नितेश कोहर यांची २८ जून रोजी भेट झाल्याचे दिसून येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुटकेस  असताना सांगवान, वत्स, सिंग आणि खत्री यांची क्लॅरिजेस हॉटेलच्या मागे बैठक झाली.

वत्स यांनी 29 जून रोजी सिंग यांना 1 कोटी रुपये परत केल्याची पुष्टी केली. पवन खत्री देखील बैठकीत उपस्थित होते. ईडीने आरोप केला आहे की, स्टेटमेंट्स आणि सीसीटीव्ही फुटेजवरून असे दिसते की, खत्री आणि कोहर हे सांगवान, वत्स, सिंग इत्यादी खाजगी व्यक्तींना भेटत होते. लाचेच्या रकमेची वत्स आणि सिंग यांच्यात देवाणघेवाण झाल्याची त्यांना माहिती होती. सीबीआयने असा आरोप केला की, सिंह यांच्या कारमध्ये लाचेच्या रकमेची बॅग ठेवली तेव्हा पवन खत्री बैठकीत उपस्थित होते, परंतु त्यांनी या संदर्भात (Delhi Liquor Scam) कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला कधीही माहिती दिली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.